विश्वजीत कासारसह, नऊ जणांविरुद्ध मोक्का. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

विश्वजीत कासारसह, नऊ जणांविरुद्ध मोक्का.

 विश्वजीत कासारसह, नऊ जणांविरुद्ध मोक्का.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणातील संशयित आरोपी विश्वजित रमेश कासार याच्यासह नऊ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
   विश्वजीत रमेश कासार (वय-28), इंद्रजीत रमेश कासार (वय-25), मयूर बापूसाहेब नाईक (वय-30), संकेत भाऊसाहेब भालसिंग (सर्व रा. वाळकी ता. नगर), सुनील फक्कड अडसरे (रा. शेंडाळा ता.आष्टी जि.बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करंडे ता. शिरूर जि. बीड), सचिन भांबरे (रा. खेत माळवाडी ता. श्रीगोंदा) भरत भिमाजी पवार (वय 26 रा.साकत ता.नगर) संतोष भाऊसाहेब धोत्रे (रा.कारगाव ता.आष्टी जि.बीड) असे मोका लावलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील विश्वजीत कासार, इंद्रजीत कासार, मयूर नाईक, भरत पवार, संतोष धोत्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. विश्वजीत कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात सह जालना,पुणे जिल्ह्यात विविध कलमान्वये 22 गुन्हे दाखल आहेत. सध्या विश्वजीत कासार हा सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे. विश्वजीत कासार याच्यासह अन्य आरोपींनी वाळकी येथील तरुण ओंकार भालसिंग याचा खून केला होता. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहे.

No comments:

Post a Comment