साधूसंतांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करावी नगरसेविका मिनाताई चोपडा यांचे आ. संग्राम जगताप यांना पत्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

साधूसंतांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करावी नगरसेविका मिनाताई चोपडा यांचे आ. संग्राम जगताप यांना पत्र

 साधूसंतांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करावी नगरसेविका मिनाताई चोपडा यांचे आ. संग्राम जगताप यांना पत्र

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात तसेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार नगरमध्येही लसीकरण सुरु करण्यात आले आहेत. या लसीकरणात साधूसंतांनाही समावून घेतले पाहिजे. समाजजागृतीसाठी साधूसंत घरादाराचा त्याग करून देशभर फिरत असतात. अनेकवेळा त्यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा इतर कागदपत्रे नसतात. त्यामुळे त्यांना लसीकरणासाठी नोंदणी करताना अडचण येते. ही बाब लक्षात घेता शासनाने साधूसंतांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेविका मिनाताई चोपडा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आ.संग्राम जगताप यांना पत्र दिले आहे.
   या पत्रात चोपडा यांनी म्हटले आहे की, नगर शहरात आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैन साधूसाध्वी येत असतात. आजमितीस शहरात असे 50 ते 60 जैन साधूसाध्वीजी आहेत. त्यांना कोविड 19 लस मिळणे आवश्यक आहे. अनेकदा त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने त्यांची नोंदणी सरकारच्या लसीकरणाच्या ऍपवर होत नाही. त्यामुळे अनेक समाजबांधव याबाबत विशेष व्यवस्था करण्याची तसेच साधूसाध्वीजींच्या लसीकरणातील अडथळे दूर करण्याची मागणी करीत आहेत. त्यानुसार आपण शासन दरबारी पाठपुरावा करून साधूसंतांना कोविड 19 लस देता येईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here