आरोपींचा टू प्लस आरोपी मेळाव्याचे आयोजन मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसाय, मजुरी करणेबाबत मार्गदर्शन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

आरोपींचा टू प्लस आरोपी मेळाव्याचे आयोजन मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसाय, मजुरी करणेबाबत मार्गदर्शन

 आरोपींचा टू प्लस आरोपी मेळाव्याचे आयोजन मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसाय, मजुरी करणेबाबत मार्गदर्शन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या गावामधील दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या आरोपींचा टू प्लस आरोपी मेळावा घेण्यात येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी आरोपींचे मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसाय, मजुरी करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
    शहरातील तुळशीदास मंगलकार्यालयात दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या आरोपींचा टू प्लस आरोपी मेळावा घेण्यात येऊन त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना व्यवसाय, मजुरी करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यादरम्यान त्यांचे माहितीचा फॉर्म, फिंगर प्रिंट,फोटो घेण्यात आलेले आहेत. यावेळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलिप तेजनकर, सरकारी वकील सरोदे, सुधाकर पवार, श्रीगोंदा हद्दीतील पोलिस पाटील, आणि आरोपींचे नातेवाईक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment