‘कोरोना’ रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव व खात्रीशीर पर्याय - आयुक्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

‘कोरोना’ रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव व खात्रीशीर पर्याय - आयुक्त.

 भारतीय जैन संघटनेचे सहकार्यामुळे लसीकरणास गती मिळेल.

‘कोरोना’ रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव व खात्रीशीर पर्याय - आयुक्त.

अहमदनगर ः
करोना महामारी थोपविण्यासाठी लसीकरण हा एकमेव व खात्रीशीर पर्याय आहे. वैज्ञानिकांनी अहोरात्र मेहनत घेऊन करोनावर लस शोधली आहे. आताची करोनाची दुसरी लाट रोखायची असेल तर प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन व लसीकरण आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी करोना लस घ्यावी यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. या प्रयत्नांना भारतीय जैन संघटनेचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने आता नगरमध्ये लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी केले. भारतीय जैन संघटनेने मुंबई, पुणे नंतर नगर शहरात मिशन करोना लसीकरण अभियान सुरू केले आहे. महापालिकेच्या परवानगीने बुरुडगाव रोडवरील जिजामाता दवाखान्यात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले म्हणाले की, भारतीय जैन संघटनेने करोना काळात सुरुवातीपासून महत्त्वाचे योगदान देत लोकांना धीर देण्याचे काम केले आहे. महानगरपालिकेच्या यंत्रणेला बीजेएसमुळे मोठी मदत मिळाली आहे. आताही लसीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेत आमच्या प्रभागातून त्यांनी कार्य सुरु केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांचीही उत्स्फूर्त साथ मिळेल असा विश्वास आहे. नगरसेविकास मिनाताई चोपडा म्हणाल्या की, भारतीय जैन संघटनेने करोना काळात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. जिथे जिथे मदतीची आवश्यकता असेल तिथे बीजेएसची टिम धावून जाते. हे काम आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

   आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, करोना महामारीच्या अंताची सुरूवात करोना लसीकरण मोहीमेमुळे झाली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे करोना विरूद्धच्या लढ्यात बीजेएसने योगदान दिले. तसेच योगदान आता लसीकरणातही देण्यात येत आहे. मनपाच्या सहाही लसीकरण केंद्रांवर बीजेएसचे स्वयंसेवक तैनात असणार आहेत. याठिकाणी लसीकरणासाठी येणार्या नागरिकांना नोंदणी, आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची काळजी घेणे, प्रत्येकाला व्यवस्थित लस मिळेल यासाठी बीजेएस समन्वयकाची भूमिका बजावेल. राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मान्यतेने बीजेएस मुंबई तसेच पुण्यातही मिशन करोना लसीकरण अभियान राबवित आहे. नगरमध्येही महापालिकेला या मोहिमेत सहकार्य करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होइल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
   प्रशांत गांधी यांनी सांगितले की, मनपाच्या जिजामाता दवाखान्यासह केडगाव आरोग्य केंद्र, आकाशवाणी जवळील केंद्र तसेच इतर तीन आरोग्य केंद्रात बीजेएस लसीकरणासाठी मदत करत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण कमी होण्याबरोबरच नागरिकांनाही नियोजनबद्ध पद्धतीने लस मिळू शकेल.
   यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, नगरसेविका मीनाताई चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, अजय ढोणे, मनपा उपायुक्त डॉ.पठारे, यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिजामाता दवाखान्याच्या प्रमुख डॉ. आएशा शेख, सिस्टर खिलारी, योगेश तांबे, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, बीजेएसचे शहराध्यक्ष प्रशांत गांधी, गिरीश अग्रवाल, महेश गुंदेचा, महेश गुगळे, संतोष कासवा, नितीन शिंगवी, नितीन शिंगवी, रोशन चोरडिया, खिलारी सिस्टर, बीजेएसचे टेक्निशियन प्रतिक्षा जगदाळे, किर्ती नवले, प्रतिक जगदाळे, अशोक वनवे, ज्ञानेश्वर वायभासे, अक्षता शर्मा, अक्षय कानडे, बाबासाहेब गिते, अतुल वैरागर आदी उपस्थित होते. मर्चंटस् बँकेचे संचालक तथा माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here