डॉक्टर खर्‍या अर्थाने देवदूत पण...; साईदीप हॉस्पिटल मधील डॉक्टर बनले यमदूत... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

डॉक्टर खर्‍या अर्थाने देवदूत पण...; साईदीप हॉस्पिटल मधील डॉक्टर बनले यमदूत...

 डॉक्टर खर्‍या अर्थाने देवदूत पण...; साईदीप हॉस्पिटल मधील डॉक्टर बनले यमदूत...

कोरोना मृतदेह बिलासाठी 12 तास ताटकळत ठेवला!
‘साईदीप हॉस्पिटल’वर कारवाई करा; चर्मकार विकास संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी

कल्पना चंद्रकांत जगताप कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना उपचारासाठी दि.13 मार्च रोजी साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार योग्य पद्धतीने न मिळाल्याने दि.27 मार्च रोजी कल्पना जगताप यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबाला या रुग्णांच्या वेळोवेळी प्रकृतीच्या संदर्भात माहिती न देता अंधारात ठेवण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी किती खर्च येईल? याची माहिती न देताच वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे जमा करण्यात आले. जवळ जवळ तीन लाखांच्या आसपास बिल वसूल करण्यात आले आहे. साईदीप हॉस्पिटलला कोरोना वार्डमध्ये रुग्णांना जेवण देण्यासाठी कोणत्याही सुरक्षेविना कुटुंबातील सदस्यांना पाठविण्यात आले. यामुळे कुटुंबातील इतर सदस्यही कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह झाले. याला साईदीप हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे. कल्पना जगताप यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असता, पुर्ण बील न भरल्याने त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला नाही. या मृतदेहावर अंत्यविधी लवकर होण्यासाठी मृतदेह मनपा प्रशासनाच्या ताब्यात देण्याची हॉस्पिटल प्रशासनाला त्यांच्या कुटुंबीयांनी विनंती केली. मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाचे बील पुर्ण भरण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धमकावून दमबाजी केली. साईदीप हॉस्पिटलने शासनाच्या आदेशाचे नियमांचे उल्लंघन केले आहे. गोरगरीब जनतेला योग्य उपचार न देता फक्त व्यवसाय म्हणून लूट सुरू केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत जनतेला चांगले उपचार देऊन आधार देण्याऐवजी जास्तीचे बिले आकारून त्यांना कर्जबाजारी करुन लुटण्याचे काम सुरु साईदिप हॉस्पिटल करीत आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः डॉक्टर.. खर्‍या अर्थाने देवदूत... आपल्या शरीराच, मनाच. दुखणं हमखास बरा करणारा तज्ञ... ‘डॉक्टर’ म्हणजे दिलासा... मनाला उभारी, जीवनाची नवी उमेद. असह्य वेदनेतून हमखास सुटका करणारा अवलिया... हा डॉक्टर नावाचा गौरव अहमदनगर मधील साईदीप हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केवळ पैशासाठी कोरोना रुग्णांचा मृतदेह 12 तास लटकून मातीमोल केलाय..... रुग्ण व डॉक्टर यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासलाय. पैशासाठी मृतदेहांची अवहेलना करणार्‍या या हॉस्पिटलच्या प्रशासनाने लाखोंचे बिल काढलंय. अशा हॉस्पिटलवर शासनाने त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी बारा तास ताटकळत ठेऊन त्याची अवहेलना करुन, नातेवाईकांना पैश्यासाठी मानसिक त्रास देत धमकाविल्याप्रकरणी शहरातील साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन दिले. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ही देण्यात आले.
   शासन आदेशाच्या नियमांचे उल्लंघन करुन साईदीप हॉस्पिटलचे कामकाज सुरु असून, त्यांच्या कारभाराची व जास्तीच्या बीलांचे ऑडिट करून हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
‘डॉक्टर आणि रुग्ण यांचे आपआपसातील नाते हे सेवा आणि विश्वास या धाग्यांनी पूर्वी गुंफलेले होते. परंतु, त्याचे रूपांतर आता ग्राहक आणि विक्रेता या स्वरूपात झाले आहे. ’हा डॉक्टर मला लुटणार’ या संशयाने रुग्ण डॉक्टरांकडे, तर रुग्ण मला कोर्टात खेचणार, या संशयाने डॉक्टर रुग्णांकडे पहात असतो. एकूणच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील निकोप नाते लयास जाऊन हे नाते संशयाच्या भोवर्‍यात अडकले असून ते गढूळ झाले आहे.
‘डॉक्टरकीचे नकळत व्यवसायात रूपांतार झाले आहे. रुग्ण सेवा देणार्‍या डॉक्टरांपेक्षा भांडवलदारांच्या हातात हा व्यवसाय स्थिरावला आहे. हे भांडवलदार व्यवसायिक तज्ज्ञ डॉक्टरांना नोकरीवर ठेवतात आणि ते सांगतील तशी रुग्णसेवा चालवण्यास भाग पाडत आहेत. त्यांनी डॉक्टरीपेशा हायजॅक केला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. रुग्णसेवा देताना डॉक्टरांनी दोन श्वासातील जे अंतर आहे ते अंतर सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णांच्या डॉक्टरांकडून जशा अपेक्षा असतात त्याचप्रमाणे डॉक्टरांची देखील रुग्णांकडून सहकार्याची अपेक्षा असते. परंतु हे नाते अद्वैताकडून द्वैताकडे सरकल्याने गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. मनुष्याचा अती जगण्याचा हव्यास या सेवेचे व्यवसायात रूपांतर होण्यास कारणीभूत आहे.तीस वर्षांपूर्वीचे आजार वेगळेच होते. औषधेही वेगळी होती. तपास वेगळे होते. उपचार वेगळे होते. पेशंटच्या गरजा वेगळ्या होत्या. पालकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. डॉक्टरांची मानसिकता वेगळी होती.
   तीस वर्षांपूर्वी आमचे वॉर्ड धनुर्वात, घटसर्प, पोलिओ, क्षय, सिफिलिस, जन्मत: गुदमरल्यामुळे येणारा मतिमंदपणा, आनुवंशिक आजार यांनी भरलेले असायचे. आता लसीकरणामुळे, प्रभावी औषधांमुळे, गरोदरपणीच्या सोनोग्राफीमुळे आणि जन्मत: डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे हे आजार बरेचसे कमी झाले आहेत. परंतु असं असलं तरी आजही आमचे वॉर्ड रिकामे नाहीत; ते आता अपुर्‍या दिवसांची बाळे, अँटिबायोटिक्सना दाद न देणार्‍या विषाणूंचे आजार, क्लोरोक्विनला न जुमानणारा मलेरिया, एड्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे पूर्वी माहीत नसलेले आजार यांनी भरले आहेत. कुपोषण, खरूज, जंत कमी झाले आहेत. परंतु लठ्ठपणा, नैराश्य, मधुमेह वाढले आहेत. अनेक चक्रे अदृश्यपणे एकमेकांना गती देत आहेत.
   तेव्हा पेनिसिलिनची जादू सर्वज्ञात होती. मृत्यूमध्येच ज्याचे पर्यवसान होई तो न्यूमोनिया पेनिसिलिनच्या एका इंजेक्शनने विरघळू लागला होता. पेनिसिलिनपाठोपाठ अनेक अँटिबायोटिक्स आली. जणू अल्लाउद्दीनचा दिवाच आमच्या हाती आला. कित्येक आजार- अगदी टीबी, महारोग, सिफिलिससुद्धा सहज बरे होऊ लागले. जंतूंविरुद्धच्या युद्धात आपण जिंकलो असा गर्व होऊ लागला. या गर्वाचा फुगा गेल्या दोन-तीन वर्षांत फुटला आहे. अँटिबायोटिक्सना दाद न देणारे जंतू आता सर्रास सापडू लागले आहेत आणि माणसाचे धाबे दणाणले आहेत. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत वैद्यक क्षेत्रातही तंत्रज्ञानाने भरीव कामगिरी केली आहे. रोगनिदान करण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची खूप मदत होते आहे. एक्स-रे, सी. टी., एम. आर., सोनोग्राफी, अद्ययावत लॅब, सुसज्ज आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स असलेली भलीमोठी हॉस्पिटल्स लोकांसाठी आज उपलब्ध आहेत. परंतु त्याचवेळी ‘फॅमिली डॉक्टर’ ही जमात नष्ट झाली आहे. लोकांचा डॉक्टरांवरचा विश्वास कमी झाला आहे. डॉक्टर पेशंटपासून मनाने अलिप्त होत आहेत. बदललेली परिस्थिती डॉक्टर-पेशंट नात्याचे चक्रही फिरवते आहे.

No comments:

Post a Comment