महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रूईछत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयातील दोन खेळाडूची वेगवेगळ्या वजन गटातुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता निवड झाली. त्या बद्दल महाविद्यालयावतीने प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानी जनता कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाबर हे होते. या वेळेस उपप्राचार्य डॉ डी एस तळुले उपस्थित होते  क्रिडा संचालक प्रा. दादासाहेब वाळके यांनी प्रास्ताविक केले. 64 वी वरीष्ठ गट राज्यस्तरीय कुस्ती व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा -2020-21 अहमदनगर जिल्हा निवड चाचणी निकाल नुकताच लागला यात  माती विभागात  79 कि वजन गटात विकास गोरे तर 86 वजन गटामध्ये विकास सासवडे यांची निवड झाली.

No comments:

Post a Comment