राजकारणासह महिला विविध क्षेत्रात आघाडीवरः नगरसेविका पुष्पाताई बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

राजकारणासह महिला विविध क्षेत्रात आघाडीवरः नगरसेविका पुष्पाताई बोरुडे

 राजकारणासह महिला विविध क्षेत्रात आघाडीवरः नगरसेविका पुष्पाताई बोरुडे    


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच आज महिलांना समाजात समानतेची वागणूक मिळत असून सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांडतकेच संधी प्राप्त झाली आहे. एकेकाळी चूल आणि मुल एव्ढेच महिलांचे कार्यक्षेत्र होते. मात्र आता संधी उपलब्ध झाल्याने महिला राजकारणासह विविध क्षेत्रा आघाडीवर असलेले चित्र दिसत असल्याचे प्रतिपादन नगरसेविका पुष्पाताई बोरूडे यांनी केले.
   पिंपळगाव माळवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती सतीश बनकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच पुर्वजा श्रीनिवास बोलला हिने कथक नृत्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच दरेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी आशाताई निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल बोरुडे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी बोरुडे बोलत होत्या.
   यावेळी पल्लवी बोरुडे, कावेरी बोरुडे, अश्विनी बोरूडे, मंजुश्री फुलसौंदर आदी उपस्थित होत्या. यावेळी भारती बनकर म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे विविध पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्या माध्यमातून एक गृहिणी उत्तमप्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार चालवू शकते व त्या पदाला न्याय देवू शकते, हे दाखवून देण्याची संधी मिळाली आहे, असे त्या म्हणाल्या.
   यावेळी बोलताना पुर्वजा बोज़ा म्हणाली की, युवती व महिलांना शिक्षणाबरोबरच विविधकला, साहित्य व क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मला सुरुवातीपासून नृत्याची आवड असल्याने मी कथक नृत्याचा अभ्यासपूर्ण सराव करुन विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आज माझा सत्कार होत असताना मला मनस्वी आनंद होत आहे, असे ती म्हणाली.शिवसेना महिला आघाडीच्या आशाताई निंबाळकर म्हणाल्या की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. पक्षामध्ये विविध पदांवर महिलांना संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणात देखील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले. आज माझी दरेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल होत असलेल्या सत्कारामुळे भविष्यात उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे, असे ते यावेळी म्हणाल्या.

No comments:

Post a Comment