विधवा शेतकरी महिलेच्या शेतातील अनाधिकृत ड्रेनेजलाईनचे काम थांबवावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

विधवा शेतकरी महिलेच्या शेतातील अनाधिकृत ड्रेनेजलाईनचे काम थांबवावे

 विधवा शेतकरी महिलेच्या शेतातील अनाधिकृत ड्रेनेजलाईनचे काम थांबवावे

परवानगी न घेता काम करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिकेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सावेडी येथील वाघमळा परिसरात विधवा शेतकरी महिलेच्या शेतात अनाधिकृतपणे ड्रेनेजलाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर प्रकरणी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील संबंधीतांवर कारवाई होत नसल्याने मनपा उपायुक्त डॉ. प्रदिप पठारे यांना दुसर्यांदा स्मरणपत्र देऊन सदरील काम थांबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, विलास कराळे, रावसाहेब काळे, पिंटू चव्हाण, फिरोज सय्यद उपस्थित होते.
वाघमळा येथे यमुनाबाई मारूती वाघ यांची 21 गुंठे शेत जमीन आहे. काही व्यक्तींनी महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनाधिकृतपणे खड्डे खोदून ड्रेनेज लाईनचे काम सुरू केल्याची तक्रार सदर विधवा महिलेने महापालिकेकडे केली होती. मात्र मनपा प्रशासन या अनाधिकृत कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने पुन्हा दुसर्यांदा स्मरणपत्र देऊन महिलेच्या शेत जमीनीत अनाधिकृतपणे सुरु असलेल्या ड्रेनेजलाईनचे काम त्वरीत थांबवून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment