ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला आज राहुरीत उत्साहात प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला आज राहुरीत उत्साहात प्रारंभ

 ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला आज राहुरीत उत्साहात प्रारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः कोरोना लसीकरणाच्या पुढील टप्प्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला आज राहुरीत उत्साहात प्रारंभ झाला आहे . राहुरी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी उत्साहाने जेष्ठ नागरिक येत असल्याचे चित्र दिसून येत आहे . दरम्यान राहुरीतील खाजगी डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांना तब्बल दीड महिन्यानंतर मुहूर्त लागला आहे . जवळपास 350 खाजगी डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांचे लसीकरण केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून आज सांगण्यात आले . जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून राहुरी तालुक्यातील दीड हजार राहुरी ग्रामीण रुग्णालय व कृषी विद्यापीठातील लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे . शासकीय अधिकारी , कर्मचारी , आरोग्य विभाग , आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या लसीकरण मोहीम झाल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला आज राहुरीत उत्साहात प्रारंभ झाला आहे .
सर्व नियमांचे पालन करीत सकाळपासून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक कोविड 19 लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सोबत आधार कार्ड , पॅन कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स , पासबुक यापैकी एक ओळखपत्र असे आवाहन प्रशासनाच्या वतीने कडून केले जात आहे .
दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये राहुरी तालुक्यातील डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांच्या नावाची यादी जिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाने पाठवली होती . मात्र तांत्रिक कारणांनी न झाल्याने लसीकरण मोहीम नाराजी व्यक्त केली जात होती . आता या साडेतीनशे डॉक्टर्स व त्यांच्या सहकार्‍यांच्या एसी करण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment