सावता परिषदेच्यावतीने राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मास्कचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

सावता परिषदेच्यावतीने राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मास्कचे वाटप

 सावता परिषदेच्यावतीने राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मास्कचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आ. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार व  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सावता परिषद अहमदनगर शहर जिल्हा यांच्या वतीने राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मास्कचे वाटप करण्यात आले.
   यावेळी सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे, प्रदेश महासचिव मयूर राजे वैद्य, प्रदेशाध्यक्ष मनीषा सचिन सोनमाळी यांच्या मार्गदर्शनानुसार राधाबाई काळे महिला महाविद्यालयात कोरोना पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना   सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून  मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी सावता परिषद जिल्हा अध्यक्ष गणेश विठ्ठल बनकर, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, जिल्हा महासचिव सागर चौरे, शहर महासचिव राजू नगरे, शहर अध्यक्ष नितीन डागवाले, शहर संघटक प्रकाश नेमाणे, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. माधव सरोदे, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. सतीश शिर्के आदी उपस्थित होते.  या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने  सावता परिषदेचा सन्मान केला.
   प्रथमतः सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त फुलेंच्या प्रतिमेला  अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सावता  परिषदेचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment