आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्रीः जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्रीः जगताप

 आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्रीः जगताप

शांतीनगरला महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्री होय. प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवून महिला प्रगतीसाठी मोठे योगदान देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपली भूमिका समर्थपणे बजावणारी महिला खर्या अर्थाने कर्तुत्ववान आहे. कुटुंबातील विविध जबाबदार्या पार पाडून माहेर आणि सासर दोन कुटुंबाला प्रकाशमान करणारी स्त्री आहे. सातत्याने धडपड करणारी महिला ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभच असल्याची भावना नगरसेविका शीतल जगताप यांनी व्यक्त केली.
   नेहरू युवा केंद्र, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, उमंग फाउंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने सारसनगर येथील शांतीनगर भागात महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका जगताप बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शासनाचा राज्य युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, डॉ. संतोष गिर्हे, धनाजी बनसोडे, पोपट बनकर, शाहीर कान्हू सुंबे, प्रा.सुनिल मतकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, डॉ.अमोल बागुल, निकिता वाघचौरे, शरद वाघमारे, रजनी ताठे, उत्कर्षच्या संस्थापक अध्यक्षा नयना बनकर, सचिव सिमोन बनकर, उमंगच्या सचिव वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.
   या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका अलका मतकर, विद्या तन्वर, पूजा सकट, निर्मला बनकर, प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे या कर्तृत्वान महिलांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. डॉ. धनाजी बनसोडे यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगून महिला व युवतींची रक्तगट, हिमोग्लोबिन व मधुमेहाची तपासणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here