मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांचा सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 25, 2021

मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांचा सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरले

 मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांचा सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरले

235  हून अधिक शहरांमध्ये 325  हून अधिक आऊटलेट्स आणि 92,000  हून अधिक समाधानी ग्राहक

अहमदनगर ः
मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठीचा विभाग आपल्या 235  हून अधिक शहरांमधील 325  हून अधिक आऊटलेट्ससह सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरला आहे. व्यावसायिक विभागातील ग्राहकांचा खरेदीचा अनुभव नव्या स्वरुपात मांडण्यासाठी या रीटेल चॅनलने मूल्यावर भर देणार्‍या ग्राहकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा समजून घेतल्या आहेत. कमर्शिअल रीटेल माध्यमात गॅसोलाइन आणि फॅक्टरी फिटेड एस-सीएनजी अशा दोन इंधन पर्यायांमध्ये व्यापक श्रेणी उपलब्ध आहे. मारुती सुझुकी कमर्शिअल व्हीइकल गाडी विकत घेण्याचा, चालवण्याचा आणि देखभालीचा असा तिनही बाबतीत कमी खर्च हा तिहेरी लाभ देऊ करत आहे.
   मारुती सुझुकीच्या व्यापक सर्विस नेटवर्कच्या सहजसोप्या विक्रीपश्चात सेवेची शाश्वती मिळत असल्याने कमर्शिअल रीटेल नेटवर्कने नुकताच 92000  हून अधिक विक्रीचा टप्पा पार केला. प्रवासी दळणवळण तसेच कार्गो/मालवाहतूक व्यवसायतील ग्राहकांसाठी मारुती सुझुकी कमर्शिअलमध्ये व्यावसायिक वाहनांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे. यात सुपर कॅरी आणि एको कार्गो अशा दमदार मालवाहतूक वाहनांसोबतच अल्टो-टूर एच वन, सेलेरिओ-टूर एच टु, डीझायर-टूर एस, एर्टिगा-टूर एम  आणि एको-टूर व्ही  अशा प्रवासी वाहतूक वाहनांचा समावेश आहे. वैशिष्ट्यपूर्ण ग्राहकवर्गासोबत कमर्शिअल नेटवर्कने निर्माण केलेल्या दृढ बंधाविषयी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) श्री. शशांक श्रीवास्तव म्हणाले, आमच्या कमर्शिअल विभागाची रचना ग्राहकांच्या बहुविध गरजांच्या दृष्टीने करण्यात आली आहे. आमच्या महत्त्वाच्या ग्राहकांमध्ये मार्केट लोड ऑपरेटर्स, कॅप्टिव ओनर्स, ओनर-कम-ड्रायव्हर्स आणि फ्लीट मालकांचा समावेश आहे. ही वाहने त्यांच्या दैनंदिन व्यवसाय, रोजगार आणि नफ्यातील महत्त्वाचा भाग आहेत. यामुळे ते गाडीची, ती चालवण्याची आणि देखभालीची किंमत याबाबतीत जागरुक राहतात आणि त्याचवेळी त्यांना गाडी बंद केल्यास कमीतकमी डाऊनटाईम मिळतो. आमच्या कमर्शिअल विभागातील वाहने आणि त्यांची आर्थिक खर्च पाहता प्रत्येकच ग्राहक या मूल्यवर्धित सेवांमुळे समाधानी आहे. ते पुढे म्हणाले, कमर्शिअल वाहनांची दमदार श्रेणी आणि व्यापक सेल्स अ‍ॅण्ड सर्विसेस नेटवर्कमुळे आमच्या विश्वासार्ह ग्राहकांना शाश्वती मिळते. यामुळे निर्णय घेणेही त्यांच्यासाठी सोपे होते. आमच्या फॅक्टरी फिटेड एस-सीएनजी रेंज तसेच गॅसोलाइन इंधन पर्यायामुळे अतिरिक्त लाभ मिळतात. आमचा खास व्यावसायिक विभाग आणि विविध वाहनांची रेंज आमच्या ग्राहकांसाठी विश्वासार्हता आणि खात्रीचा सर्वसमावेशक लाभ मिळवून देते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here