फेज-2 योजनेतील रस्ता कॉसिंग व पाईप जोडण्याचे काम30 एप्रिलपर्यत पूर्ण करण्याचे आदेश- महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

फेज-2 योजनेतील रस्ता कॉसिंग व पाईप जोडण्याचे काम30 एप्रिलपर्यत पूर्ण करण्याचे आदेश- महापौर वाकळे

 फेज-2 योजनेतील रस्ता कॉसिंग व पाईप जोडण्याचे काम30 एप्रिलपर्यत पूर्ण करण्याचे आदेश- महापौर वाकळे




 नगरी दवंडी

 

अहमदनगर - शहातील पाणी पुरवठा सुरुळीत करुन नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. अनेक वर्षापासून सुरु असलेली फेज-2 पाणी योजना 30 एप्रिल पर्यत  पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. याचबरोबर अमृत पाणी योजनेतून वसंत टेकडी येथे 50 लाख लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी सुरू करावी या टाकीत पाणी टाकून चाचणी करण्यात आली असून या टाकीला विळद वरून येणा-या पाण्याची लाईन जोडावी याच बरोबर शहरामध्ये फेज-2 पाणी योजने अंतर्गत 7 पाण्याच्या टाकीचे कामे अनेक वर्षापासून पूर्ण झाले आहे. या टाक्याही पाणी भरून  कार्यान्वीत कराव्यात जेणे करून नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा मिळेल. तसेच पाण्याची गळती ही थांबण्यास मदत होईल. नगर शहराच्या अमृत व  फेज-2 पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर नगर शहराला दररोज पूर्ण दाबाने पाणी मिळणार असल्याची माहिती मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

      वसंतटेकडी अमृत पाणी योजनेतील 50 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची पाहणी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, सतिष शिंदे, संजय ढोणे, परिमल निकम, शहर पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, योजनेचे ठेकेदार पानसे आदी

      महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, केंद्र सरकाच्या विविध योजनेची कामे शहरामध्ये सुरू असून ही कामे युध्द पातळीवर पूर्ण करावीत पाईप लाईन वितरणाचे काम पूर्ण झाले असून रस्ता क्रॉसिंग व पाईप जोडण्याचे काम सुरू आहे. 15 झोन पैकी 6 झोनचे काम प्रगतीपथावर आहे. 15 झोन चे काम 30 एप्रिल पर्यत पूर्ण करणे बाबत आदेश दिले. रस्ता क्रॉसिंग व पाईप जोडण्यासाठी संबंधीत ठेकेदार यांनी कामगारांची संख्या वाढवून काम तातडीने करण्याचे आदेश दिले.

      मलनिस्सारण योजनेतील सिव्हील वर्क 80 टक्के पूर्ण झाले असून 15 दिवसामध्ये राहिलेले काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सिना नदीच्या कडेने पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामापैकी 3 कि.मी.चे काम बाकी आहे ते देखील काम 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले. मे अखेर शहर भुयारी गटर योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत दिले. सदर बैठकीस जलअभियंता परिमल निकम, कार्यकारी अभियंता अर्जुन नाडागौडा, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, अभियंता रोहोकले, माजिप्राचे शाखा अभियंता बडे, सार्व.बांधकाम अभियंता थोरात, ठेकेदार संस्थेचे रितेश आगरवाल, शंकर खोत, निखील पाटील ,राजेश लयचेट्टी, सोनू चौधरी आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment