उपेक्षित महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ः नवसुपे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

उपेक्षित महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ः नवसुपे

 उपेक्षित महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ः नवसुपे

जागतिक महिला दिनानिमित्ताने शिवराष्ट्र सेनेच्यावतीने महिलांचा सत्कार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः घराचा पाया पुरुष असले तर महिला आधार स्तंभ होते. आज हिंदू संस्कृतीत महिलेला दुर्गा शक्तीची प्रतिमा म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत महिला देशाच्या उच्च शिखरावरील सर्वच पद भुषविले आहेत. परंतु आज अजूनही महिलांची उपेक्षा केली जाते. ते निंदयनीय आहे. आजच्या सत्कारानिमित्त शिव राष्ट्र सेना पक्ष अशा उपेक्षित महिलेच्या पाठिशी उभा आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. आज पोलिस, बांधकाम, स्वरक्षण, भाजीपाला अशा विविध स्वरुपाच्या क्षेत्रात काम करणार्या महिलांचा पुजन करुन सत्कार करुन त्यांच्या कार्याचा जो गौरव केला आहे, त्यामुळे त्यांनी प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन सौ.रत्ना नवसुपे यांनी केले.
    जागतिक महिला दिनानिमित्त शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने सिद्धार्थनगर येथे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.  यामध्ये  महिला पोलिस हवालदार पुष्पा सोनवणे, सौ.सुंदरबाई शेलार, आशाबाई पठारे, मंगल गांगुर्डे, गिता पठारे, कविता पठारे, लक्ष्मी चव्हाण, अंजुबाई चावरे, सिंधुबाई खुडे, पार्वती राजगुरु, सुनोत्रा घोरपडे, संगिता शिंदे, रत्नमाला शेकटकर यांचा सत्कार सौ.रत्ना नवसुपे व माजी नगरसेविका उमा शेकटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
   यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विजय पितळे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, युवा प्रमुख शंभु नवसुपे, ओंकार जाधव, शेतकरी आघाडीचे भैरवनाथ खंडागळे, कामगार अध्यक्ष संतोष मांडे, देखरेख समिती अध्यक्ष समिर खडके, सुनिल भोसले, गणेश शेकटकर, राहुल शेकटकर, बाळासाहेब जाधव, अरुण खिच्चे आदि उपस्थित होते. अनिल शेकटकर म्हणाले, महिलांनी कोरोना काळात मोलाचे कार्य केले आहे. शिव राष्ट्र सेनेच्यावतीने वर्षभर त्यांना आदराचे स्थान देऊन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम नेहमीच करु, असे सांगून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
   याप्रसंगी सौ.हेमलता घोरपडे यांनी शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानून आम्ही करत असलेल्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे एकप्रकारे आम्हाला ऊर्जा मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन समिर खडके यांनी  केले. शेवटी जालिंदर कुलट यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here