महिलांचा आदर सन्मान 365 दिवस करावा ः ढोणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

महिलांचा आदर सन्मान 365 दिवस करावा ः ढोणे

 महिलांचा आदर सन्मान 365 दिवस करावा ः ढोणे

सीताराम सारडा विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा  

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे.आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी  घेतली आहे.देशातील महिलांनी पंतप्रधान,राष्ट्रपती,अंतराळवीर,वैमानिक,आमदार,खासदार,साहित्यिक  अश्या सर्वच क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवून कर्तृत्व सिद्ध केले आहे.महिलांचा आदर सन्मान एकच दिवस न करता 365 दिवस करावा. असे प्रतिपादन उपमहापौर मालनताई ढोणे यांनी केले.
   हिंदसेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल यांच्यातर्फे भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन शाळेतील महिला शिक्षकांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षिका सौ.अलका भालेकर यांच्यातर्फे शाळेतील मुलींना मास्कचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.शुभदा खेर होत्या.
   याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे,नगरसेविका सुप्रियाताई जाधव,हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी,सीताराम सारडा विद्यालयाचे चेअरमन प्रा.मकरंद खेर,,निर्मलाताई बोरा,मीनलताई बोरा,मेहेर इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी,सौ.स्वाती मुदगल,पालक शिक्षक संघाच्या सारिका शिंदे,नंदा गोरखे,सविता आहेर,चवलीया भाभी आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी  व कर्मचारी वृंद उपस्थित होते.  
 नगरसेविका सुप्रिया जाधव म्हणाल्या कि,महिलांचे जीवन हे पूर्वीपासूनच संघर्षाचे आहे.महिलांनी झाशीचे राणी सारखे व्हावे.त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार रोखले जातील.अजित बोरा म्हणाले कि,सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.आज महिलांनी सर्वच क्षेत्र आघाडी घेतली आहे.व कार्याचा ठसा उमटविला आहे.महिलांचा आदर सन्मान हि भारतीय संस्कृती आहे. डॉ.पारस कोठारी म्हणाले कि,प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्री हि वेगवेगळ्या रूपाने येत असते.ती कोणाची बहीण, माता, पत्नी,मुलगी,सून हे सर्व नाते आदर सन्मानाने सांभाळल्यास खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा होईल.स्त्री शक्ती महान आहे.हे त्यांनी स्वकर्तुत्वाने सिद्ध केले आहे. या कार्यक्रमात सौ क्रांती मुंदनकर,वर्ष कुलकर्णी,विनोद देसाई,दीपक शिरसाठ या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक अशोक डोळसे यांनी केले.सूत्र संचालन रवींद्र चोभे यांनी केले तर आभार श्री बोडखे यांनी मानले.

No comments:

Post a Comment