डॉ.बागुल यांचे जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने जलबचतीवर वेबिनार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

डॉ.बागुल यांचे जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने जलबचतीवर वेबिनार

 डॉ.बागुल यांचे जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने जलबचतीवर वेबिनार

नगरचे शिक्षक डॉ. अमोल बागुल सांगणार जलबचतीवरील हजारो उपाय

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः भारत सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय जल मिशनच्या जलशक्ती अभियानाअंतर्गत नेहरू युवा केंद्र ,भारत सरकार तसेच आधारवड बहुउद्देशीय संस्था आणि जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ.(महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार* डॉ.अमोल बागुल यांचे चला पाणी पिकवू या या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे
   मंगळवार दि.9 मार्च 2021 रोजी दुपारी 3 वा.सुमारे चार फेसबुक अकाऊंटवर हे व्याख्यान ऑनलाइन आयोजित करण्यात आले आहे.उपक्रमाचे स्वागत अँड.अनिता दिघे तर प्रास्ताविक अँड महेश शिंदे प्रस्तुत करतील.या संपूर्ण उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र,अहमदनगरचे जिल्हा समन्वयक शिवाजी खरात यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.मारुतराव घुले पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे  सहकार्य उपक्रमासाठी लाभले असून प्रा.सोपान दहातोंडे या ऑनलाईन उपक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप, युट्युब टेलिग्राम,टेलिग्राफ या समाज माध्यमांवर वरील कार्यक्रमाची लिंक उपलब्ध होणार असून अधिक माहितीसाठी 7720009001 या क्रमांकावर आपले काही प्रश्न,उपाय अथवा जलबचतीच्या अनोख्या योजना असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
   डॉ.बागुल यांच्या जलबचतीचे हजारो उपाय या शोधनिबंधाचे निवड केन्द्र सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमात झाली होती.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अद्वितीय पाणीपुरवठा योजनेसह खापरी नळ पाणी योजना तसेच जलद व जनतेच्या विविध परिणामकारक योजनांचे शास्त्रशुद्ध विवेचन डॉ. बागुल यांनी केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, रोटरी तसेच लायन्स क्लब व विविध स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित जलबचतीवरील सुमारे 100 पेक्षा जास्त पथनाटये बागूल यांनी आपल्या कलाकार मित्रांसह सादर केली आहेत.

No comments:

Post a Comment