वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद... भाविकांनी फिरवली शिवलयाकडे पाठ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद... भाविकांनी फिरवली शिवलयाकडे पाठ.

 वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद... भाविकांनी फिरवली शिवलयाकडे पाठ.

ना ‘बम भोले’चा गजर! ना शंखध्वनीचा निनाद...
जिल्ह्यात वृद्धेश्वर, कायगाव टोके, भाळवणीचे नागेश्वर मंदिर, मांदळी येथील लालगीर स्वामी मंदिर, डोंगरगण येथील मंदिर, मांडवगण येथील मांड्यव्य ऋषींचे मंदिर, याबरोबरच शहरातील बेलेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर आदी महत्वाची शिव मंदिरे आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भाविकांना विविध तीर्थाच्या ठिकाणी जाता यावे यासाठी जादा बसची व्यवस्था करण्यात येत होती. परंतु यावेळी कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बर्‍याच ठिकाणची देवस्थाने बंद करण्यात आली. भाविकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळेही यावर्षी जादा एसटी बसेस रद्द करण्यात आल्या. - अभिजित आघाव, तारकपूर आगार व्यवस्थापक

महाशिवरात्रि साजरी करण्याविषयीच्या बर्‍याच कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध कथेनुसार हा उत्सव शिव आणि देवी पार्वती यांच्या एकत्रित येण्याची रात्र म्हणून साजरा केला जातो.पंचांगानुसार, महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे. या दिवशी भगवान शिव यांची विशेष पूजा केली जाते. शिवरात्रि दर महिन्याला येत असली तरी, फाल्गुन महिन्यातील चतुर्दशीला येणार्‍या महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व मानले जाते. महाशिवरात्रि ही शिव आणि शक्ती यांच्या एकत्रितेची रात्र आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपासनेने सर्व त्रास दूर होतात. महाशिवरात्री साजरी करण्याविषयी बर्‍याच कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध कथेनुसार हा उत्सव शिव आणि देवी पार्वती यांच्या एकत्रित येण्याची रात्र म्हणून साजरा केला जातो.असे मानले जाते की पार्वतीने या दिवशी भगवान शिव यांच्याशी विवाह केला होता. असा विश्वास आहे की या दिवशी शिव जगात 64 वे शिवलिंग म्हणून प्रकट झाले. त्यापैकी लोकांना केवळ 12 शिवलिंग सापडले. ज्याला आपण 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतो.
॥ अविनाश निमसे ॥

अहमदनगर ः
महाशिवरात्र हा भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भाविक मंदिरात जाऊन पूजा अर्चा, त्रिदिनात्मक सोहळा, कीर्तन, प्रवचन, शिवलीलामृत पारायण, शिवकथा, भजन, आरती, हरिपाठ, होमहवन, जलाभिषेक, महारुद्राभिषेक, मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करतात. पण राज्यात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढल्यामुळे प्रशासनाने मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज ना ‘बम भोले’चा गजर ना शंखध्वनीचा निनाद घुमला. आज भाविकांनी महाशिवरात्र घरीच साजरी केली. शिवलयाकडे भाविकांनी पाठ फिरवली असली, तरी जिल्ह्यात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली.

     येत्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांनी शिवलायकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र यंदाच्या महाशिवरात्रीला पाहावयास मिळाले. नगरमध्ये कोरोना बधितांचा आकडा वाढतच चालला असून भाविकांनी महाशिवरात्री घरात राहूनच साजरी केली. यामुळे जिल्ह्यातील अनेक महत्वाची व प्रसिद्ध शिवालाये या शिवरात्रीला भाविकां अभावी ओस पडल्याचे स्पष्ट झाले.
     महाशिवरात्रीला जिल्ह्यातील विविध शिवमंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी सुरुवातीपासूनच मोठी जय्यत तयारी करत हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते पण कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कोठेही आज उत्सवात साजरी करण्यात आली नाही.
     मंदिरामध्ये भाविकांना महाप्रसाद, खिचडी, फळे वाटण्यात येतात. तर बर्‍याच ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भारतात. परंतु यावर्षी कोरोना रोगाचे सावट सर्वदूर पसरल्याने अनेक ठिकाणच्या यात्रा जत्रा रद्द करण्यात आल्या. काही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता पाहून स्थानिक प्रशासनाने  पहाटे पासून ते रात्री उशीरा पर्यंत शिवमंदिरे बंद केली. तर बहुतांश भाविकांनी आपल्या घरातच महाशिवरात्री साजरी करून बाहेर जाण्याचे जाणीवपूर्वक टाळले. यामुळे नेहमी गर्दीने फुलणारी शिव मंदिरे यावेळी मात्र भाविकांअभावी ओस पडली.

No comments:

Post a Comment