क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सौ. रोहिणीताई संजय काशिद जागर स्त्री शक्तीचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 10, 2021

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सौ. रोहिणीताई संजय काशिद जागर स्त्री शक्तीचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सौ. रोहिणीताई संजय काशिद जागर स्त्री शक्तीचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला.नगरी दवंडी

जामखेड

आज दि. 10/3/2021 बुधवार सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व माता भगिनीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आजच्या दिवशी आपण सर्व कर्तृत्ववान स्त्रीयांचा सत्कार करणार आहोत पतीच्या निधनानंतर स्त्रीया त्या स्त्री शक्तीचे जिवंत उदाहरण आहे. शेतकरी कुटुंबात हे जास्त पहायला मिळते कारण शेतकरी कर्जामुळे शेतातील पिक खराब आल्यामुळे शेत पिकाला भाव न मिळाल्याने आत्महत्या करतात आणि आपल्या कुटुंबाला सोडून जातात परंतु त्यानंतर शेतकऱ्यांची पत्नीचा सर्व कुटुंबाचा संभाळ करते व आज आपण जागर स्त्री शक्तीचा या समारंभात या यशस्वी माताभिगिनीचा सन्मान करण्यात येणार आहे. सौ.रोहिणीताई काशीद यांनी पती निधनानंतर कुटुंबांचा समर्थपणे सांभाळ करणारया यशस्वी माता भगिनींना श्रीफळ ,शाॅल ,मास्क, साडी देऊन त्यांचा सन्मान केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया तंटक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित:-

अॅड .सौ.स्नेहल फुटाणे,  सौ. आरती राळेभात (मॅडम),  डॉ.सौ. विद्या काशीद,  डॉ.सौ.मनिषा पवार  सौ. मिरा तंटक (शिवसेना महिला तालुका संघटक जामखेड), सौ. गौरी कुचेकर ( शिवसेना शहरप्रमुख जामखेड)

यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला व 100 हुन अधिक  महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here