आज उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

आज उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस.

 आज उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस.


मुंबई :
राज्यात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. जे.जे. रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना कोरोना लस घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी आणि सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील होते. नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली.

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोना लस घेणार असल्याची माहिती दिली होती. आज त्यांनी जे.जे.रुग्णालयात लस घेतली आहे. माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील कोरोनाची घेतली आहे. तसेच रश्मी ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई पाटणकरांचं लसीकरण झालं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोना लस डोचून घेतली आहे.

No comments:

Post a Comment