ती 45 मिनिटं... व्हॉट्सअपकडुन दिलगिरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

ती 45 मिनिटं... व्हॉट्सअपकडुन दिलगिरी

 ती 45 मिनिटं... व्हॉट्सअपकडुन दिलगिरी

व्हॉट्सअप सर्व्हर, इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजरही डाऊन.

काल रात्री जगभरातील सर्व युजर्सचे कामकाज व्हॉट्सअ‍ॅपने थांबवले. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होत असताना इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजरही डाऊन असल्याचे दिसून आले. यामुळे युजर्समध्ये अधिक नाराजी दिसली. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले असताना केवळ मेसेज जाणे-येणे थांबले नाही, तर व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हरशी कनेक्ट होतानाही बर्‍याच अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले असताना सिग्नल अ‍ॅप्लिकेशनवर अनेक युजर्स वळल्याचे दिसून आले. दरम्यान सिग्नल अ‍ॅप्लिकेशनच्या युजर्समध्ये अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी कंपनीने ट्विट करत युजर्सची संख्या अचानक वाढली असल्याची माहिती दिली. साधारण तब्बल 45 मिनिटांसाठी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने एक निवेदन ट्विटरद्वारे जारी केले. या निवेदनात कंपनीने त्यांच्या युजर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. ‘तुमच्यातील संयमाबद्दल धन्यवाद, 45 मिनिटांचा हा वेळ खूप मोठा होता. मात्र आता आम्ही पुन्हा आलो आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here