पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा ः गाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा ः गाडे

 पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा ः गाडे

महिला शिक्षकांचा रोपे देऊन महिला दिन साजरा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः स्त्रीयांना समान हक्क मिळून कायदे झाले. शिक्षणाच्या संधी मिळाल्याने स्वावलंबी झाल्या, अनेक बाबतीत प्रगती केली, त्यामुळे त्यांना स्वत:ची कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळाली. रोजगार, आरोग्य सेवा, सामाजिक समस्यांचा पाठपुरावा करताना पर्यावरणाला महत्व देऊन पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगरसेविका ज्योतीताई गाडे यांनी केले.
फकिरवाडा येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात महिला शिक्षकांना रोपे देऊन महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सौ.गाडे बोलत होत्या. याप्रसंगी अर्बन बँकेचे निवृत्त शाखाधिकारी हेमंत बल्लाळ, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, लक्षवेधी नागरिक सेवा संघटनेचे कुतुबुद्दीन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
   सौ.गाडे पुढे म्हणाल्या, स्त्रीयांनी अध्यात्मापासून ते रणभुमीपर्यंत वेळोवेळी कर्तुत्व गाजवलेले आहे. तरीही स्त्रीयांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे कोणी दाखल घेत नाही, ही परिस्थिती बदलण्याची गरज गरज आहे. पर्यावरणाचा समतोल ठेवायचा तर वृक्षारोपण होणे हाच पर्याय आहे.
   यावेळी हेमंत बल्लाळ म्हणाले, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी रशिदाबी सेवा प्रतिष्ठानतर्फे रोपवाटिका कार्यक्रम करुन महिलांना जी रोपे वाटप केली त्यांचे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन संगोपन होणे गरजेचे आहे.
   प्रतिष्ठानचे कुतुबुद्दीन शेख म्हणाले, आपण जसे घरातील मुला-बाळांना जपतो, तसे वृक्षांना जपा. त्यांची जोपासना करा, प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा म्हणजे पर्यावरणाचा र्हास थांबेल. प्रारंभी मुख्याध्यापिका एच.सी.बनकर यांनी महिला दिनाचे महत्व विषद केले. श्रीमती एन.पी.गोरे यांनी कर्तुत्ववान महिलांचा इतिहास सांगितला. शेवटी गाडेकर सरांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here