स्थायी समिती ‘सभापतीपद’.. शिवसेनेला धोबीपछाड... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

स्थायी समिती ‘सभापतीपद’.. शिवसेनेला धोबीपछाड...

 स्थायी समिती ‘सभापतीपद’.. शिवसेनेला धोबीपछाड...

महापौरांच्या उपस्थितीत अविनाश घुलेंचा अर्ज दाखल.
राष्ट्रवादी भाजपा युतीवर शिक्कामोर्तब

राज्यातील शिवसेना वरिष्ठ नेत्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. वरिष्ठांनी आदेश दिला तर शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येईल व आम्ही निवडणुकीस सामोरे जाऊ
- रोहिणी शेंडगे, गटनेत्या शिवसेना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत आज दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.
अविनाश घुले यांचे एका उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बसपाचे मुदस्सर शेख तर राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे हे अनुमोदक आहेत. दुसर्‍या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे सागर बोरुडे अनुमोदक म्हणून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव आहेत. भाजपा चार, राष्ट्रवादी पाच , काँग्रेस एक, बसपा एक अशा एकुण अकरा सदस्यांचे बहुमत असून आता शिवसेनेच्या पाच सदस्यांची गरज नसल्याचे दिसून येत आहे.
मनपा स्थायी समिती सभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शिवसेनेमध्ये मोठ्या हालचाली सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला बरोबर घेईल अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना होती पण आज महापौरांच्या उपस्थितीत अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे शिवसेनेचा अपेक्षाभंग झाला आहे.  
   राज्यात राष्ट्रवादी- शिवसेना-काँग्रेस अशी महाविकास आघाडीची सत्ता असताना अहमदनगर मध्ये मात्र मह विकासआघाडी अस्तित्वात येऊ शकली नाही. जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना राष्ट्रवादीकडून महाविकासआघाडी जिल्ह्यातही अस्तित्वात यावी अशी अपेक्षा असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मनपातील भाजपची साथ सोडायला तयार नाही. मागील स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरला, पण वरिष्ठांच्या आदेशामुळे तो मागे घेतला. उद्या शिवसेना उमेदवारी अर्ज भरलेले की नाही हे उद्याच स्पष्ट होईल.
   मनपा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्टवादी कॉगेस पक्षाकडून नगरसेवक अविनाश घुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, शेख मुद्सर, मनोज दुलम, धनंजय जाधव, सचिन जाधव, संजय चोपडा, विनीत पाऊलबुध्ये, सुनील त्रम्बके, निखिल वारे, सागर बोरुडे आदी उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment