ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताह संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताह संपन्न

 ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताह संपन्न



नगरी दवंडी

कर्जत -कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त बाजार तळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, तर भाविकांनी समाधी मंदिरात भक्ती भावाने दर्शन घेतले. 

            कर्जत येथे संत श्री गोदड महाराज यांनी माघ महिन्यात शुक्ल पक्षात मंगळवारी चतुर्थी दिवशी संजीवन समाधी घेतली होती. दरवर्षी कर्जत येथे यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहा चे आयोजन करण्यात येते सालाबाद प्रणाने यावर्षीही अनेक नामवंत किर्तनकाराची कीर्तने व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला, 

कर्जत येथील समाधी मंदिरात ट्रस्टी व भाविक भक्तांनी भजन केले, तर भाविकांनी अत्यंत भक्ती भावाने दर्शन घेतले, आज हभप महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवत भाविकांनी आपल्या श्रद्धेने अध्यात्माचा आनंद घेतला. यावेळी काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment