चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे 18 हजार रुपये काढले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे 18 हजार रुपये काढले.

 चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे 18 हजार रुपये काढले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः चोरलेल्या एटीएम कार्ड द्वारे 18 हजार रुपये काढून घेणार्‍या आदिनाथ रावसाहेब कार्ले वय 24 रा.चास जि. अहमदनगर यांस भिंगार कॅम्प पोलिसांनी गजाआड करून एटीएम मधून काढण्यात आलेले 18 हजार रुपये जप्त केले आहेत.
   सदर घटनेची हकीकत अशी की सौ. विजया बाळासाहेब गावखरे रा. प्रदर्शनी शाळेसमोर, साईप्रसाद रो हाऊसिंग सोसायटी, नगर पाथर्डी रोड यांचे पतीचे एस बी आय बँकेचे ए टी एम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून एटीएम मधून 18 हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार भिंगार कॅम्प पोलिसांकडे नोंदविली होती. या गुन्ह्याचा तपास जी.डी.गोल्हार यांना देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असतांना, संबंधीं बँकेबरोबर पत्रव्यवहार करून मिळालेल्या डाटाचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीताची माहिती घेऊन आरोपी निष्पन्न करून त्याबाबत त्यास गुन्ह्यात अटक करणेसाठी शिशिर कुमार देशमुख, गोविंद दादासाहेब गोल्हार, रमेश वराट, संतोष भाऊसाहेब अडसूळ, राहुल राजेंद्र द्वारके, अरुण मोरे असे पथक नेमून आदिनाथ कार्ले यास अटक केली. त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपीकडून त्याने चोरलेले एटीएम कार्ड व त्याचा वापर करून एटीएम मधून काढलेली रोख रक्कम 18,000/- रु. असा 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विशाल दुमे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/शिशिर कुमार देशमुख यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गोविंद दादासाहेब गोल्हार हे करत आहे.

No comments:

Post a Comment