सावित्रीबाई कला महाविद्यालयातील भोंडवे व इंगळे यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

सावित्रीबाई कला महाविद्यालयातील भोंडवे व इंगळे यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 सावित्रीबाई कला महाविद्यालयातील भोंडवे व इंगळे यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील पिपळगाव पिसा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई कला महाविद्यालयातील एस. वाय. बी. ए. मध्ये शिकत असलेल्या भोंडवे दिग्विजय संदीप व इंगळे कुलदीप संतोष या दोन विद्यार्थ्यांची जूनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी 130 किलो व 82 किलो वजन गटात ग्रीको-रोमन स्पर्धेसाठी चंदिगड येथे होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. कुकडी शिक्षण संस्थेचे प्रमुख मा. आ.राहुलजगताप व संस्थेच्या विश्वस्त डॉ.प्रणोती जगताप तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव ढगे, उपप्राचार्य डॉ. शांतीलाल घेगडे,आणि कुकडी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.या दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रवींद्र शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment