हरित परिवारच्या माध्यमातून एक ओंजळ धान्य पक्ष्यांसाठी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

हरित परिवारच्या माध्यमातून एक ओंजळ धान्य पक्ष्यांसाठी

 हरित परिवारच्या माध्यमातून एक ओंजळ धान्य पक्ष्यांसाठी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे हरित परिवारच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येत उन्हाळ्यात खास एक ओंजळ धान्य पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबविला आहे .दुष्काळ , पावसाची अनिश्चितता , अवैध वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तालुक्यातील चिंभळे येथे दोन वर्षापूर्वी गावातील तरुणांनी सुनील गायकवाड सर व उद्धव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन चार एकर पडीक जमिनीत वड , चिंच , जांभूळ , सीताफळ , पेरू , आंबा , उंबर , लिब या सारख्या 400 झाडांची लागवड करत त्यांना कूपनलिका व ठिबकद्वारे पाणीपुरवठा करून हिरवीगार वनराई फुलविली. फुललेल्या झाडांवर चिमण्या , कावळे , साळुकी , कबुतर , तितर , कोतवाल , भारद्वाज , कोकीळ या सारखे पक्षी येत आहेत. उन्हाळा सुरु झाल्याने या पक्ष्यांना खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी हरित परिवार ग्रुपने एकत्र येऊन एक ओंजळ धान्य पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबविला असुन त्यासाठी पत्र्या तेलाचे रिकामे डबे घेऊन कमी खर्चात योग्य पद्धतीने कट करून त्यामध्ये पाण्याची सोय करून दररोज गहू, बाजरी , तांदूळ,ज्वारी असे धान्य टाकून हे डबे झाडाच्या फांद्यांना लटकविले असल्याने या पक्ष्यांनी झाडांवर घरटे बांधले आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण वनराईचा परिसर गजबजून गेला आहे.

No comments:

Post a Comment