बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन

 बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने  तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने  तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले.

सध्या देशावर राज्य करणारा शासकवर्ग हा लोकशाही व संविधान विरोधी आहे. कारण सरकार सातत्याने संविधानविरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे आणि संविधानाच्या विरोधात जाऊन नवनवीन हुकूमशाही कायदे पारित करीत आहे. त्यामुळे देशातील लोहशाहीला धोका निर्माण होवुन, भांडवलशाहीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारच्या अशा भांडवलशाही धोरणामुळे सामान्य नागरिकांचे संवैधानिक मूलभूत अधिकार संपुष्टात येऊन देशात प्रचंड महागाई बेरोजगारी उपासमारी आर्थिक विषमता आणि शोषण व पिळवणूक आशा महाभयंकर समस्यांनी थैमान घातले आहे परिणामी सामान्य तरुण गुन्हेगारी कडे वळू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेच्या मनात सरकार विरोधी प्रचंड असंतोष व विद्रोह निर्माण झाला आहे. परंतु जनतेचा आवाज दडपुन टाकण्यासाठी सरकारी यंत्रणेद्वारे कोरोना व्हायरस व लॉकडाऊनचा वापर करून जनतेच्या मनामध्ये भितीचे व नैराश्याचे वातावरण निर्माण केले जात आहे आणि त्याद्वारे लोकांच्या मनातील असंतोष व विद्रोह दाबला जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, सरकारच्या लोकशाही व संविधान विरोधी धोरणांना व कायद्यांना रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी  पारनेर येथे विविध सामाजिक पक्ष व संघटनाद्वारे पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले
प्रमुख मागण्या शेतक-यांना देशोधडीला लावणारे व भांडवलशाहीला पोषक असणारे नवीन शेतकरी विरोधी काळे कायदे ताबडतोब रद्द करा.
लोकशाही आणि संविधानाचा घात करून, कामगार वर्गाला भांडवलदारांचे गुलाम व वेठबिगार बनविणारे नवीन कामगार विरोधी कायदे ताबडतोब रद्द करा.        शेतकर्‍यांचा खंडीत केलेला विजपुरवठा ताबडतोब सुरळीत करुन द्यावा व शेतकर्‍यांना विज दरात सवलत देण्यात यावी.जीवनाश्यक वस्तुंच्या सतत वाढणार्‍या प्रचंड महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस निर्णय द्यावेत.              
घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल व सी.एन.जी.यांची सतत होणारी भाववाढ तात्काळ थांबवावी.        नागरिकांची शासन दरबारातील कामे नियमित प्रमाणे निर्धारित वेळेत केली जावी दप्तर दिरंगाई ची कारवाई कठोर अंमलबजावणी व्हावी. महिला बचत गटाच्या कर्जाची सक्तीची वसुली थांबून ती कर्ज माफ करावीत राज्य सरकारने ओबीसी एन टी एस सी एस टी प्रवर्गाचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे सदर निर्णय ताबडतोब मागे घ्यावा आगामी जनगणनेच्या कार्यक्रमात ओबीसीची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी                     , देशातील आगामी सर्वच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एतच् मशिनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करावा. देशातील निवडणूकांमध्ये एतच् मशिनचा वापर बंद करावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटना तर्फे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना देण्यात आले
यावेळी बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, राष्ट्रीय किसान मोर्चा अविनाश देशमुख, बलुतेदार संघटना बाळासाहेब शिरता र ,बहुजन क्रांती मोर्चा अमित जाधव ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आयुब शेख, ओबीसी संघटना शरद गोरे, आदिवासी एकता परिषद ईश्वर भोसले ,किरण सोनवणे, सुभाष गायकवाड ,वसीम राजे ,अजय साळवे ,अमोल ठुबे, सतीश मस्के, सागर भिंगारदिवे, विशाल लहुजी साळवे, ताराचंद सोनवणे, ऋषिकेश रविंद्र कांबळे ,महेश लहू पठारे ,यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.

No comments:

Post a Comment