कोरोना हॉस्पिटलला अभय गुंदेचा यांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

कोरोना हॉस्पिटलला अभय गुंदेचा यांची मदत

 कोरोना हॉस्पिटलला अभय गुंदेचा यांची मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः आज जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प कोरोना हॉस्पिटल ला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रेरणेने तेथील कोरोणा रुग्णासाठी  अभय चंपालाल गुंदेचा 11000=00 अकरा हजार रुपये किराणा  सामाण, गणेश सुरेश भळगट गहू 100 किलो तांदूळ 50 किलो ज्वारी 60 किलो मटकी 11 किलो हरभरा 25 किलो, रवींद्र गादीया गहू 100 किलो, डॉक्टर भरत दारकुंडे किराणा सामान साठी  5000=00 पाच हजार रुपये विजय बालचंद बोगावत किराणा साठी 2100=00 रुपये तसेच अमोल  सुमित चानोदिया यांनी 60 किलो गहू दिलेला आहे तसेच रामकृष्ण विवेकानंद सेवा आश्रम शिरूर यांनी औषधे मेडिकल साहित्य 25500=00 पंचवीस हजार पाचशे ते औषधे मेडिकल साहित्य दिले आहे आज 228 पेशंट तिथे आहोत 19 पेशंटला डिस्चार्ज झाला असून 30 तीस पेशंट वाढले आहेत यावेळची रविदादा आणि सुलतान मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांच्या मित्र कंपनी चे आभार मानले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ,गणेश भळगट, रवींद्र गादिया ,डॉक्टर  भरत दारकुंडे , रणजीत सुराणा ,अमोल लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य नान्नज लियाकत शेख ,अरुण लटके,विशाल ढवळे आदी उपस्थित होते.
यावेळी हॉस्पिटल मधील सुलताना मॅडम आणि डिगोळ येथील कोरणा पॉझिटिव पेशंट यांनी संजय कोठारी आणि त्यांच्या मित्र परिवाराचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here