ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तिमत्व विकास साधावा ः आ. काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तिमत्व विकास साधावा ः आ. काळे

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तिमत्व विकास साधावा ः आ. काळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आय. डी. एफ. सी. फर्स्ट भारत लि. यांच्यावतीने डिजिटल बोर्ड भेट देण्यात आला. महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान समिती अंतर्गत या डिजिटल बोर्डचे उदघाट्न मा. आमदार आशुतोषजी काळे, अध्यक्ष उत्तर विभाग सल्लागार समिती, अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आय. डी. एफ. सी. फर्स्ट भारत ली. च्या वतीने मा. जॉन पॉल अशोक, असिस्टंट जनरल  मॅनेजर सी.एस.आर.विभाग, श्री.शरद देडे,  मॅनेजर, सी. एस. आर. विभाग, श्री. ज्ञानेश्वर दातीर, श्री. सतीश वैद्य यांनी आपल्या मनोगतातून आय. डी. एफ. सी. फर्स्ट भारत लि. च्या उपक्रमा विषयी माहिती दिली. तसेच महिलांसाठी खास उपक्रमात महिला महाविद्यालयाचे योगदान असावे असे मनोगातून स्पष्ट केले. विद्यार्थिनीच्या विकासासाठी अनेक स्पर्धा माहिती तंत्रज्ञानाचे युग व विद्यार्थिनीचा विकास यासाठी आय. डी. एफ. सी. फर्स्ट भारत लि. चे विविध कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यात आली.
अध्यक्षीय मनोगतातून मा. आमदार श्री. आशुतोषजी काळे यांनी ’ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी काळाची पाऊले ओळखून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपला सर्वांगीण विकास करावा यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे ’असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी रयत शिक्षण संस्था व राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या उपक्रमाची ओळख उपस्थित मान्यवरांना करून दिली व महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान समितीचा मुख्य उद्देश व विद्यार्थिनीचा सर्वांगीण विकास याविषयी मनोगत व्यक्त केले.
या उदघाटन कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे, कनिष्ठ विभागाचे विभागप्रमुख प्रा. सतीश शिर्के, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. योगिता रांधवणे यांनी केले. कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment