नेप्ती उपबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

नेप्ती उपबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू

 नेप्ती उपबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु झाले असल्याची म बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी दिली आहे.
सन 2020-21 या वर्षामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती, नेप्ती उपबाजार आवार या ठिकाणी सुरु झाली आहे.
शासनाने कडधान्य खरेदीचे दर जाहीर केले असून  त्यानुसार हरभरा या शेतमालास प्रती क्विंटलसाठी  5100 रु.याप्रमाणे बाजारभाव निश्चित केला आहे. तरी शेतकर्‍यांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच आपला शेतमाल (हरभरा ) वाळवून स्वच्छ करुन व 12 टक्के अद्रता असलेले आणावा. निकृष्ट दर्जाचा शेतमाल स्वीकारला जाणार नसून शेतीमालाची नोंदणी प्रक्रिया व दिनांक 1 मार्च पासून हरभरा खरेदी उपबाजार नेप्ती येथील खरेदी केंद्रावर सुरु झाली आहे.
शेतकर्‍यांनी  हरभरा या पिकाची ऑनलाईन नोंद असलेला  ओरिजनल 7/12 व 8 अ, आधार कार्ड झेरॉक्स तसेच आधारकार्डशी सलग्न असलेल्या राष्टीयकृत बँक पासबूक झेरॉक्स, खाते नंबर व आय.एफ.सी कोड ठळक नोंद असणे आवश्यक  आहे. यामध्ये जनधन खाते स्वीकारले जाणार नसून  शेतमाल आणण्यासाठी एस.एम.एस. द्वारे कळविण्यांत येणार असल्याची माहिती  सभापती अभिलाष  घिगे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here