अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे पाणपोई शुभारंभ कार्यक्रम संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे पाणपोई शुभारंभ कार्यक्रम संपन्न

 अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे पाणपोई शुभारंभ कार्यक्रम संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने सालाबाद प्रमाणे करसेठजी रोड येथील सोशल क्लब च्या कार्यालय जवळ पाणपोई शुभारंभ प्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते जुनेद मन्सुर शेख म्हणाले, मी अहमदनगर सोशल क्लब फौउंडेशन चे सामाजिक कार्य नेहमी पहात आलो असुन समाजातील तरुणांना नेहमी प्रेरणा देणारे काम संस्था अग्रेक्रमाने करीत आले आहे. पाणपोई शुभारंभ निमित्ताने ग्रुपला शुभेच्छा व्यक्त करतो.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या नलिनी गायकवाड म्हणाल्या गोरगरीब जनतेला या तिष्ण उन्हात पाणी हवे असते. त्यांना अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने रामचंद्र खुंट येथे मोफत पाणपोई उपलब्ध करून एक प्रकारे पुण्याचे काम संस्था करीत असल्याचे गोरव उदगार नलिनी गायकवाड यांनी काढलेत.
कोरोना महामारी मधे लोक कोणालाही मदत करण्यास धजावत असतांना उन्हाळ्याच्या दिवसात एक ग्लास पाणी सुध्दा कोणी देण्यास लवकर तयार होत नाही. अशात अहमदनगर. सोशल फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने सालाबाद प्रमाणे पाणपोई चे आयोजन करुन सर्व सामान्यांचा दुवा मिळवण्याचे काम प्रमाणिकपणे सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते इंजि.इम्रान हाजी अन्वर खान पत्रकार यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्रातील अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्ट चे कार्य महत्त्वाचे असुन अनेक सामाजिक काम संस्था गरजुंसाठी करत आहे. त्यांच्या या कार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे प्रतिपादन उत्कर्ष बालगृहाचे संचालक युवराज गुंड यांनी केले.
हजरत मोहम्मद सल्लाहो ताआला अलैहे वसल्लम यांनी समस्त मानव जातीला संदेश देताना पृथ्वी वरील सर्वात पुण्याचे काम कोणते असेल तर ते भुकलेल्यांना अन्न व तहानलेल्याना पाणी देणे असल्याचे सांगितले आहे. आणि याच प्रामाणिक भावनेतून आम्ही अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने पाणपोई चे आयोजन केले आहे सर्वांनी याचे लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर सोशल क्लब फौउंडेशन चे अध्यक्ष नईम सरदार यांनी केले आहे. कार्यक्रमास नलिनी गायकवाड, जुनेद मन्सुर शेख, नवेद शेख, निसार बागवान, नादिर खान, पैलवान हमज़ा चुडीवाला, इंजि.इम्रान हाजी अन्वर खान पत्रकार, राजमोहम्मद नुरी, नईम सरदार, युवराज गुंड, आदीं उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here