‘सद्गुरू गोदडनाथ कथामृत’ या श्रीकांत निलंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

‘सद्गुरू गोदडनाथ कथामृत’ या श्रीकांत निलंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन

 ‘सद्गुरू गोदडनाथ कथामृत’ या श्रीकांत निलंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या जीवन कार्यावरील सद्गुरू गोदडनाथ कथामृत या श्रीकांत निलंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन तुकाराम बीजेच्या निमित्त महाराजाच्या समाधी मंदिरात सम्पन्न झाले.
संत परंपरेतील श्री गोदड महाराज यांचा जन्म व समाधी कर्जत मध्ये असून त्यांनी मोठी ग्रंथ संपदा लिहून ठेवली मात्र महाराजांच्या कार्याची प्रचार-प्रसार म्हणावा तेवढा झालेला नाही, त्यामुळे महान संत परंपरेतील महाराजाच्या कार्याची महती सर्वाना व्हावी म्हणून  त्याची पोथी,  उपलब्ध ग्रंथ संपदा, विविध ठिकाणचे संदर्भ, यांंचा अभ्यास करून मूळ कर्जतचे रहिवाशी व सध्या पुणे येथे आहे स्थाईक झालेले श्रीकांत उर्फ बाळासाहेब निलंगे यांनी सद्गुरू गोदडनाथ कथामृत हे पुस्तक लिहिले व त्याचे प्रकाशन तुकाराम बिजेचे औचित्य साधत संत श्री गोदड महाराजाच्या मंदिरात करण्यात आले, यावेळी बाळासाहेब निलंगे यांनी या पुस्तक लेखनाची संकल्पना सांगताना याबाबत आलेले अनुभव कथन केले. महाराज कसे दिसत होते याबाबत त्रंबकेश्वर येथील  यती श्री माधवानंद तीर्थ स्वामी यांना ध्यानावस्थेत महाराजानी दर्शन दिले व त्यांनी त्याचे जसे वर्णन केले तसे चित्रकारा कडून चित्र रेखाटून घेतल्याचे सांगितले, या पुस्तकाच्या विक्री तून जे पैसे येतील त्यातून पुन्हा हेच पुस्तके छापली जातील व यातील पैसा गोदड महाराजाच्या कार्यासाठी समर्पित असेल असे ही निलंगे यांनी सांगितले, याशिवाय महाराष्ट्रातील सर्व किर्तनकाराना हे पुस्तक आपण भेट स्वरूपात देणार आहोत अशी ही माहिती त्यांनी दिली. यावेळी
पहिले पुस्तक समाधी समोर ठेऊन व त्याचे पूजन करत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे, अनिल काकडे, प्रदीप पाटील, उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत, सुरेश खिस्ती, स्वप्नील देसाई, वैभव शहा, काकासाहेब धांडे, राजेंद्र तोरडमल, यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली, यावेळी अमोल सोनमाळी, नितीन बोरा, बिभीषण खोसे, दीपक लांगोरे, उद्धवराव भोगे, भीमा जंगम, आदी सह अनेक मान्यवर व भजनी व भाविक उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जेवरे यांनी केले.

No comments:

Post a Comment