राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा युवक सरचिटणीसपदी रमेश व्हरकटे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा युवक सरचिटणीसपदी रमेश व्हरकटे यांची निवड

 राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा युवक सरचिटणीसपदी रमेश व्हरकटे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा युवक सरचिटणीसपदी रमेश व्हरकटे यांची निवड झाली

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे  व महासचिव बाळासाहेब दोलतडे  यांच्या आदेशानुसार  कर्जत तालुक्यातील पक्षाचे खंदे समर्थक व अत्यंत तळमळीने प्रत्येक कार्यात सक्रिय असणारे चिंचोली कालदातचे रमेश व्हरकटे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा युवक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. नुकतीच पक्षाच्या बैठकीत प्रा. माणिकराव दांगडे, उत्तर महाराष्ट्र प्रभारी शरदभाऊ बाचकर, अल्पसंख्यांक आघाडी उत्तर महाराष्ट्र सय्यद बाबा शेख,  शहाजी कोरडकर, गंगाराम कोळेकर, नानासाहेब झुंझारे  यांच्या हस्ते व्हरकटे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना रमेश व्हरकटे म्हणाले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे  विचार तळागाळात रुजवणार असून येणार्‍या काळात राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यातील गावागावात वाढवणार असून पक्षाचा वेगाने शाखा  विस्तार करून येणार्‍या सर्व निवडणुका पक्ष लढवणार  आहे, शेतकर्‍यांच्या  हितासाठी आंदोलन, मोर्चा  यासह  गाव तिथे शाखा  व पक्षाचे ध्येयधोरणे  सर्व जिल्ह्याच्या कानकोपर्‍यात रुजवणार आहोत असे म्हटले. या निवडीबद्दल रवींद्र कोठारी, भानुदास हाके मेजर, राजेंद्र शिंदे, महेंद्र कोपनर, दादा खामगळ, संतोष कानडे, कचरादास हुलगुंडे, संभाजी मेरगळ, भरत लांभोर, बापु बिटके,  मनोज गलांडे, श्रीराम देवकाते  यांच्यासह अनेकांनी त्याचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here