रिजवीचा अहमदनगर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

रिजवीचा अहमदनगर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

 रिजवीचा अहमदनगर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

कुराणच्या आयतबद्दल चुकीचे वक्तव्य करुन, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्‍या

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ईस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील 26 आयत हटविण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य करुन, सदर मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारा वसीम रिजवी याच्यावर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी व देशाची शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिजवी याच्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवून, सदर मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी (महसुल) उर्मिला पाटील यांना देण्यात आले. यावेळी मन्सूर शेख, मौलाना अब्दुल सलाम, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मुफ्ती अल्ताफ, डॉ.रिजवान अहमद, नगरसेवक समद खान, अज्जू शेख, अल्तमश जरीवाला, फिरोज शेख, अन्सार सय्यद, अकलाख शेख, जुनेद शेख, नवेद शेख, रमीज शेख, जावेद शेख, नईम सरदार, हमजा चुडीवाला, अमीर सय्यद, निसार मास्टर, सरफराज शेख, अ‍ॅड.अशफाक सय्यद, वहाब सय्यद, भैय्या बॉक्सर, रिजवान पठाण, रियाज खान, जावेद सय्यद, रमजान कुरेशी, निसार बागवान, फिरोज शफी, सरफराज जहागीरदार, नदिम शेख आदिंसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी याने कुराणच्या आयतचा चुकीचा अर्थ काढून, आपल्या अज्ञानपणाचे व मानसिक संतुलन बिघडल्याचे दर्शन घडविले आहे. रिजवी याने कुराण मधील 26 आयत दहशतवादाला उत्तेजना देत असल्याचे चुकीचे आरोप करुन, सदरील आयात कुराण मधून काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. रिजवी याने अपुर्ण अभ्यासाच्या आधारावर कुराणच्या त्या 26 आयत मधील जिहादचा चुकीचा अर्थ लावला असून, मुस्लिम धर्मियांची प्रतिमा मलीन करण्याचे काम त्याने केले आहे. तर जातीयवादी संघटना व राजकीय पक्षांना भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. लखनऊ येथे झालेल्या मुस्लिम समुदायाच्या संमेलनमध्ये त्याला ईस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आले असून, रिजवी हा चुकीचा संदेश मोठ्या प्रमाणात पसरवत आहे. संपुर्ण देशात मुस्लिम समाज त्यांच्या विरोधात पेटून उठला असून, हे प्रकरण संयमाने हातळण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment