आमदार निलेश लंके ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

आमदार निलेश लंके ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

 आमदार निलेश लंके ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः राजधानी दिल्ली येथे ’महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच पार पडला, गेल्या वर्षभरात केलेल्या अनेक सामाजिक व राजकीय कामांची दखल घेत महाराष्ट्रातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील एकमेव पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांचा समावेश आहे.
आमदार निलेश लंके यांचा हा गौरव नसून संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव आहे असे या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी म्हटले! नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात लोकमत समूहाचे चेअरमन व सर्व संचालक व अधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत, पारनेर नगर तालुक्यातील या जननायकास हा सन्मान मिळाला.                      
यावेळी आमदार निलेश लंके यांनी सांगितले की हा सन्मान माझा नसून गेले कित्येक दिवस कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वाड्यावस्त्यांवर जात योगदान देणार्‍या व मला माझ्या सामाजिक कार्यात सावलीसारखे माझ्या पाठीमागे राहणार्‍या माझ्या सहकारी मित्रांचा आहे.                        
आमदार निलेश लंके यांना राजधानी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. राजेंद्र दर्डा, योगेश लखनो, (ब्राईट आसुटे) क्षी दर्डा, अखिलेश प्रसाद सिंग, खासदार प्रतापराव जाधव, खासदार कुणाल तुमाणे, संदीप सिंग, व्हाईस प्रेसिडेंट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला गेला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here