चंगेडिया यांच्यासारखे तरूण समाजाचे खरेखुरे आयडॉल आहेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

चंगेडिया यांच्यासारखे तरूण समाजाचे खरेखुरे आयडॉल आहेत

 चंगेडिया यांच्यासारखे तरूण समाजाचे खरेखुरे आयडॉल आहेत

आ. संग्राम जगताप ः सथ्था कॉलनी परिवारातर्फे चंगेडिया यांचा करोना योध्दा सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण तंतोतंत अंमलात आणत करोना काळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचे काम आदेश चंगेडिया यांनी केले. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय अडचणीच्या काळात जनतेला दिलासा देणारे उपक्रम राबवले. मोफड रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था, गरजूंच्या जेवणाची सोय, प्रवासी लोकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था, जिल्हा रूग्णालयातील आय.सी.यु.चे सक्षमीकरण अशा अनेक गोष्टींसाठी चंगेडिया यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून योगदान दिले. अतिशय तरूण वयात ते दाखवत असलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. योध्द्याप्रमाणे स्वत: आघाडीवर राहून त्यांनी करोना काळात काम केले असून असे लोक समाजासाठी खरेखुरे आयडॉल असतात, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया यांचा नुकताच सथ्था कॉलनी परिवाराच्यावतीने आ.जगताप यांच्या हस्ते करोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कार्यक्रमास मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक कुरेशी, अहमदनगर मर्चंटस को ऑप.बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, लालाशेठ मुनोत, सथ्था कॉलनीचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, सेके्रटरी विजय गुगळे, खजिनदार मनिष सावला, नरेंद्र लोहाडे, डॉ.एम.बी.मेहता, हिरालाल पोखरणा, शरद मुनोत, दीपक अगरवाल, चांदमल मुथा,,तलकसी सावला, प्रकाश गांधी, महेश मुनोत, धीरज मुनोत, सचिन मुनोत, कमलेश मुनोत, नरेश मुनोत आदी उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले की, व्यवसायात व्यस्त असतानाही समाजाचे काही देणं लागतो, या भावनेतून आदेश चंगेडिया अनेक वर्षांपासून समाजकार्यात झोकून देवून काम करतात. बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली चंगेडिया यांच्या पुढाकारातून दुष्काळी परिस्थितीत नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात जलसंधारणाचे प्रचंड असे काम झाले. गावोगावी स्वत: जनजागृती करीत त्यांनी वॉटर कप स्पर्धेला चालना दिली. याशिवाय जिल्ह्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठीचा कार्यक्रम, वधूवर परिचय मेळावे असे अनेक पथदर्शी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. सर्वांना सोबत घेवून चालण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. सामाजिक कार्याचा त्यांचा उत्साह दांडगा असून सतत नवनवीन संकल्पना घेवून त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची त्यांची धडपड असते. आदेश चंगेडिया म्हणाले की, सामाजिक कार्यासाठी सर्व ज्येष्ठांचे तसेच आ.संग्राम जगताप यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते. कोरोना काळ हा मानवतेची कसोटी पाहणारा आहे. सर्वांसाठीच ही महामारी आव्हानात्मक होती. त्यामुळे या काळात नगर शहरात आरोग्य तपासणीसाठी स्पेशल व्हॅन कार्यरत केली. नंतरही रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था केली. जिल्हा रूग्णालयात सुसज्ज आय.सी.यु.च्या उभारणीतही योगदान देता आले. यासाठी धूत चॅरिटेबल ट्रस्ट, फोर्स मोटर्स तसेच जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा रूग्णालय प्रशासनाचे सहकार्य लाभले. कोणत्या कामात अडचण आली तर आ.जगताप हे मदतीसाठी सदैव तत्पर असायचे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here