प्रभाग 1 हा विकासकामातही एक नंबर राहील : विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

प्रभाग 1 हा विकासकामातही एक नंबर राहील : विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर

 प्रभाग 1 हा विकासकामातही एक नंबर राहील : विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभागातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याची संधी दिली. या संधीच्या माध्यमातून प्रभागातील मुलभूत प्रश्नाबरोबर विकासाचे मोठे प्रकल्प राबवायचे आहेत. गेल्या 7 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून प्रश्न सोडवत आहोत. प्रभाग 1 हा उपनगरांचा भाग असून नवनवीन वसाहती येथे निर्माण होत आहे. या भागातही पायाभूत सुविधांपासून विकासकामे करावी लागत आहेत. भविष्यकाळात विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग हा नगर शहरामध्ये विकासातही 1 नंबरच असेल. आ. संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून या भागामध्ये विकासाची गंगा वाहील असे कामे सुरु आहे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर यांनी केले.
विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून प्रभाग 1 मधील तागडनगर, कसबेनगर, श्रीकृष्ण कॉलनी, देवीकृपा कॉलनी, पुण्यश्लोक कॉलनी, नाना चौक ते मारुती चौक दरम्यान बंदपाईप गटार कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अर्जुनराव कसबे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, निवृत्ती कसबे, नारायण कसबे, साहेबराव सप्रे, नानासाहेब भंवर, गणेश कसबे, विजय भोसले, बाळासाहेब जगताप, पाराजी आवारे, राजेंद्र तागड, प्रशांत आमले, चंद्रभान कडूस, कोंडीराम बेल्हेकर, रावसाहेब तागड, नरेंद्र छाजेड आदी उपस्थित होते. डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या तपोवन रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तपोवन रस्ता हा भविष्यकाळामध्ये दळवळणासह एक प्रकारची बाजारपेठ येथे निर्माण होईल. नगरसेवक संपत बारस्कर यांनी विकासकामाबरोबर प्रभागामध्ये हरितप्रभाग करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करुन लोकचळवळ उभी केली आहे, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना दीपाली बारस्कर म्हणाल्या की, प्रोफेसर कॉलनी चौकापासून कुष्ठधाम रस्ता, भिस्तबाग चौकापासून महालापर्यंतच्या रस्त्याचे कामही सुरू आहे. या रस्त्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळणार आहे. आ. जगताप यांनी या रस्त्यावरील विजवाहक तारांचे काम जमिनी अंतर्गत करण्यासाठी मोठा निधी प्राप्त केल्यामुळे ते कामही नियोजनपूर्ण सुरु आहे.

No comments:

Post a Comment