प्रभाग 4 मधील कॉलन्यांचा सर्वांगिण विकास हाच ध्यास : नगरसेवक स्वप्निल शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

प्रभाग 4 मधील कॉलन्यांचा सर्वांगिण विकास हाच ध्यास : नगरसेवक स्वप्निल शिंदे

 प्रभाग 4 मधील कॉलन्यांचा सर्वांगिण विकास हाच ध्यास : नगरसेवक स्वप्निल शिंदे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र. 4 मधील प्रत्येक कॉलनींचा सर्वांगिण विकास हाच ध्यास समजून विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे प्रभागामध्ये सर्वच भागात समांतर विकासकामे केले जातील.विकास आराखड्याच्या माध्यमातून कॉलनीतील कामांचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने एक-एक प्रश्न मार्गी लागेल. सर्व कॉलन्यांतील जमिनीअंतर्गत कामांना प्राधान्यक्रम दिला असून ही कामे पहिल्या टप्प्यात केली जातील. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण कामेही हाती घेतले आहे. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकडे बसविण्यात येत आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी महापालिकेच्या जागेमध्ये छोटे-छोटे उद्यान निर्मितीचे काम हाती घेतले आहे. प्रभागाच्या सर्वांगिण विकासातून समस्यामुक्त प्रभाग करणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक स्वप्निल शिंदे यांनी केले.
नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्या प्रयत्नातून समर्थ कॉलनी येथे रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक अमोल गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, गिरीष कुलकर्णी, चुनीलाल कोळी, मोरेश्वर मुळे, अजय आहुजा, विजय आहुजा, कर्नल मिश्रा, तुकाराम मचे, सुभाषचंद्र आहुजा, परेश भट, राजेंद्र शहाणे, अमित गटणे, ऋषीकेश देशमुख, महेश कुर्‍हे, सुरज कुरलिये, दीपक डुमरे, अक्षय डुमरे, सचिन भिंगारकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योजक गाडे म्हणाले की, समर्थ कॉलनीमध्ये गेल्या 17 वर्षांनंतर रस्त्याचे काम होत आहे. प्रभागामध्ये महापालिकेच्या माध्यमातून व आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरु आहेत. या प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.

No comments:

Post a Comment