अधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

अधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद

 अधिकृत प्रसिद्धीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना भरघोस प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दि.17/03/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्हयातील अहमदनगर शहर आणि भिंगार शहर प्रमुख कार्यकारणी,युवक आघाडी साठी मुलाखती घेण्यात आल्या, त्यासाठी बहुजन वर्गातील तरुण युवकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ज्येष्ठ नेते जिल्हा सल्लागार जीवन पारधे यांनी इच्छुक पदाधिकारी यांच्या मुलाखती घेतल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा सचिव बाळासाहेब कांबळे,जिल्हा संघटक फिरोज पठाण,महिला आघाडीच्या सदस्या ड.पुष्पा जेजूरकर,डॉ.अनुराधा मेचे, ड.निलंबरी गायकवाड, माथाडी कामगार युनियन जिल्हा सरचिटणीस सुनील भिंगारदिवे, रविभाऊ भिंगारदिवे,विवेक विधाते,अमर निरभवने,भूषण चव्हाण उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडी ची भूमिका तसेच भविष्यात पक्षाची वाटचाल कशी असावी,पक्ष वाढी साठी काय काय उपाय योजना,कोणते उपक्रम राबविले पाहिजे.यावर देखील चर्चा करण्यात आली.जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी तरुण युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करताना आपला वापर होऊ नये याची दक्षता व युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.त्यांना व्यवसायसंदर्भात मार्गदर्शन केले. व्यवसाय करताना येणारी आर्थिक अडचण यावर आपण मदत करू असे ही यावेळी ते म्हणाले. मुलाखती देण्यासाठी आलेल्या तरुण युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले. वंचित बहुजन आघाडी कडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत आहे.वंचित पक्ष हा आता एका समाजा पूर्ता मर्यादित राहिलेला नाही. इथल्या वंचित, दुर्लक्षित, शोषित, पीडित समाजासोबत, गरीब मराठा समाज आता आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली काम करण्यास तयार होत आहे. तसेच भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका कोणत्याही क्षणी तारिख जाहीर होऊ शकते या पार्श्वभूमीवर विकास सुरेश चव्हाण (च., ङङइ) यांची भिंगार शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व उर्वरित कार्यकारणी लवकरच जाहीर राष्ट्रीय अध्यक्ष आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात येईल. पुढील रणनीती आखण्यात येणार आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये होत असलेल्या पोट निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांची देखील मुलाखती घेण्यात आल्या.पोटनिवडणूक संदर्भात पक्षाची रणनीती आखण्यात आली.गेल्या वेळी पक्षाने दिलेला उमेदवार व पुरस्कृत केलेले उमेदवार यांना भारिप बहुजन महासंघ आताचा वंचित बहुजन आघाडीला तीन नंबरचे मतदान मिळाले होते. विजय वंचित बहुजन आघाडीचाच होईल असा विश्वास जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केला.यावेळी विशाल आठवले,विकास चव्हाण,जालिंदर पंडागले, मनोज कर्डिले, भाऊ साळवे, आकाश साबळे, आकाश लोखंडे, गणेश पाडले, किरण माने, हर्षद शिर्के, अनिल शिंदे, जलाज पाडले, वैभव पारधे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here