’आनंदऋषीजी नेत्रालयात आता पूर्णवेळ रेटिना सर्जन उपलब्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

’आनंदऋषीजी नेत्रालयात आता पूर्णवेळ रेटिना सर्जन उपलब्ध

 ’आनंदऋषीजी नेत्रालयात आता पूर्णवेळ रेटिना सर्जन उपलब्ध

नेत्रपटलाच्या आजारांचे अचूक
निदान व उपचार अत्यल्प दरात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालयात नेत्रोपचाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आता नेत्रालयात पूर्ण वेळ रेटिना सर्जन कार्यरत झाले आहेत. देशभरातील विविध रूग्णालयात सेवा देणारे डॉ.आदित्य नाकाडे हे नेत्रालयात पूर्ण वेळ रूजू झाले असून दु. 1 ते 3 याकाळात त्यांची ओपीडी सेवा उपलब्ध असेल. याशिवाय व्हिट्रिओ रेटिना सर्जन डॉ.हर्षल गोंधळे हे आठवड्यातून एक दिवस उपलब्ध असतील अशी माहिती नेत्रालयाचे प्रशासनाधिकारी आनंद छाजेड यांनी दिली.
आनंदऋषीजी नेत्रालयात रेटिना तपासणी व उपचार यासाठी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहे. यात ओसीटी, ग्रीन लेझर, फंडस् ंजिओग्राफी, डोळ्यांची सोनोग्राफी या सुविधा आहेत. त्याचप्रमाणे अत्याधुनिक व्हिक्टोट्रॉमी मशिनद्वारे शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. मधुमेह तसेच वाढत्या वयामुळे होणारे नेत्रपटलाचे आजार, पडदा सटकणे अशा विविध समस्यांचे अचूक निदान व प्रभावी उपचार येथे आहेत. या सर्व सेवा अत्यल्प दरात उपलब्ध असून रूग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 8686401515.

No comments:

Post a Comment