व्यापारी व हमाल यांच्यात समन्वय साधून मार्केटयार्ड विकासाबरोबरच नगर शहराचे रूप बदलणार ः घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

व्यापारी व हमाल यांच्यात समन्वय साधून मार्केटयार्ड विकासाबरोबरच नगर शहराचे रूप बदलणार ः घुले

 व्यापारी व हमाल यांच्यात समन्वय साधून मार्केटयार्ड विकासाबरोबरच नगर शहराचे रूप बदलणार ः घुले

मनपा सभापती अविनाश घुले व विविध क्षेत्रातिल मान्यवरांचा नंदकिशोर वाहतूक संघटना,  मार्केटयार्ड तर्फे सत्कार सोहळा संपन्न.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर मनपाचे सभापती पद हा काटेरी मुकुट असून त्याचा मान राखून कार्य केले जाईल.तसेच व्यापारी, हमाल व वाहतूक संघटना यांच्यात समन्वय साधून मार्केटयार्ड विकासा बरोबरच नगर शहराचे रूप बदलणार  असल्याचे मत श्री.अविनाश तात्या घुले यांनी व्यक्त केले.
मनपा सभापती अविनाश घुले, आडते बाजार असो.चे अध्यक्ष राजेंद्र चोपडा,उपाध्यक्ष राजेंद्र बोथरा,कृषी उत्त्पन्न बाजार समिती चेअरमन अमिलाष  दिघे,कोव्हिड काळात उत्कृष्ट कार्य करणारे आदेश चंगेडीया , गणेश भोसले,संजय चोपडा,भैरू कोतकर,गोविंद सांगळे सह विविध क्षेत्रातिल मान्यवरांचा नंदकिशोर वाहतूक संघटना, मार्केटयार्ड तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी ललित गुगळे,कांतीलाल गुगळे,प्रशांत गांधी,किशोर श्रीश्रीमाळ योगेश चंगेडीया,सुरेश गांधी ,किशोर पितळे,रमेश सोनी मंडलेचा,विजू कोथंबीरे,राजमल चंगेडीया,रितेश कोठारी,राजू पितळे,हमीद पठान राजू थोरात,सुरेश रासकर,राजेंद्र गुगळे,अमोल शिंगवी,नंदूशेठ गुगळे,मनोज बोरा,अनिल लुकंड,अजित गांधी  व मान्यवर उपस्थित होते.
आडते बाजार असो.चे चेअरमन राजेंद्र चोपडा म्हणाले की अविनाश घुले हे  दुसर्‍यांदा सभापती होत असून त्यांच्या अनुभवाचा नगरला निश्चित फायदा होईल ,सर्व प्रथम त्यांनी नगर मधील रस्त्यांची दुरावस्था कमी करण्यास प्राधान्य द्यावे.तसेच मार्केट यार्ड सुधारणेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
वाहतूक संघटनेचे  दिलीप माडगे यांनी सर्वांचे  स्वागत केले व आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल करपे,सुभाष राऊत,रोहिदास घोडके,नंदू बेरड,बबन बेरड,लक्ष्मण काळे,अर्जुन अवघडे.अर्जुन राऊत,काशिनाथ धाडगे,शंकर पठान,सुरेश दातरंगे आदींनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here