जय भवानी पुरुष बचत गटाचा उपक्रम दिशादर्शक : बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

जय भवानी पुरुष बचत गटाचा उपक्रम दिशादर्शक : बारस्कर

 जय भवानी पुरुष बचत गटाचा उपक्रम दिशादर्शक : बारस्कर

सभासदांना गव्हाच्या स्वरुपात लाभांशाचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र. 1 मधील जय भवानीनगर मधील पुरुषांनी एकत्र येऊन बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या माध्यमातून समाज एकत्र जोडल्या गेल्यामुळे जिव्हाळा व आपुलकी निर्माण होत आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या अडीअडचणीच्या काळात बचत गटाच्या माध्यमातून मदत होते. या बचत गटांनी सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच आरोग्यासाठी कर्जरुपी अर्थसहाय्य करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच जय भवानी पुरुष बचत गटाचा उपक्रमही दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर यांनी केले.

तपोवन रोडवरील जय भवानीनगर मधील पुरुष बचत गटाच्यावतीने सभासदांना गव्हाच्या रुपाने लाभांश वाटप करताना विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर. समवेत नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, बचत गटाचे अध्यक्ष अनिल दीनकर, सचिव भाऊसाहेब काळदाते, उपाध्यक्ष विठ्ठल खेंडके आदी सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, पुरुष बचत गटाच्या माध्यमातून शेतकर्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. या बचत गटाचा उपक्रम कौतुकास्पद असून शहरातील कॉलनीतील नागरिकांनी या बचत गटाचा आदर्श घेऊन पुरुष बचत गटांची स्थापना करावी. व पारदर्शक कारभार करुन पुरुष बचत गटांना चालना द्यावी. या बचत गटाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबविणे शक्य होईल. पुढील काळात प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन प्रभागाच्या विकासासाठी काम करू, असे ते म्हणाले.
दीपाली बारस्कर म्हणाल्या की, राज्यामध्ये महिला बचत गटांना चालना मिळाली असल्यामुळे महिलांच्या हाताला रोजगार मिळून आर्थिक हातभार लागला आहे. याचबरोबर पुरुष बचत गटांनी आपल्या इतर कामाचा व्याप सांभाळून बचत गट स्थापन करून यशस्वी करुन दाखविला. हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना अनिल दिनकर म्हणाले की, गेल्या 5 वर्षापूर्वी अवघ्या 12 सदस्यांनी मिळून जयभवानी पुरुष बचत गटाची स्थापना करून यशस्वीपणे काम केले आहे. आज बचत गटाच्या माध्यमातून 12 लाख रुपयांची ठेव जमा झाली असून सुमारे अडीच लाख रुपयांचा लाभांशपोटी सभासदांना गव्हाचे वाटप करण्यात आले. याचबरोबर सभासदाला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी 1 लाख रुपयांची कर्जरुपी मदत 1 टक्क्यानी मदत केली जाते. सर्वांच्या सहकार्यातून आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करत आहोत.
  तपोवन रोडवरील जय भवानीनगर मधील पुरुष बचत गटाच्यावतीने सभासदांना गव्हाच्या रुपाने लाभांश वाटप करताना विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर. समवेत नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, बचत गटाचे अध्यक्ष अनिल दीनकर, सचिव भाऊसाहेब काळदाते, उपाध्यक्ष विठ्ठल खेंडके आदी सभासद उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here