जागतिक महिला दिनी डॉ. कमर सुरूर यांचा राजस्थान उर्दू अकादमी, जयपूरतर्फे सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

जागतिक महिला दिनी डॉ. कमर सुरूर यांचा राजस्थान उर्दू अकादमी, जयपूरतर्फे सन्मान

 जागतिक महिला दिनी डॉ. कमर सुरूर यांचा  राजस्थान उर्दू अकादमी, जयपूरतर्फे सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागतिक महिला दिवसा निमित राजस्थान उर्दु अकादमी, जयपुर तर्फे खुशबुओं की शाम महिलाओं के नाम या महिलांच्या आखिल भारतीय मुशायरा चे आयोजन करुन भारताच्या नावाजलेल्या कवियंत्रीच्या मुशायरा मध्ये सन्मान करण्यात आला. ज्या मध्ये महाराष्ट्रतुन अहमदनगर येथील कवियत्री व अहमदनगर जिल्हा उर्दु साहित्य परिषदेच्या सहसचिव डाँ. कमर सुरुर यांचा राजस्थान मानवी हक्क कमिशन चे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डाँ. कमर सुरूर यांनी या मुशायर्यात बेटी यावर आपली कविता सादर करताना म्हणाले की
मै हूं औरत वो है मेरी बेटी
देखे दुनिया ये हक है उसको भी
ही कवितेत त्यांनी मुलींना जन्माआधीच पोटातच मारल्या जात आहे यावर प्रकाश टाकून रसिकांची भरपूर वावा मिळविली. तर समाजाला उद्देशून सांगितले की
क्या तुम्हारे लिये मुसीबतों हुँ
जुर्म मेरा यही के औरत हुँ
अशा कवितेतून त्यांनी आपल्या भावना मांडल्या व रसिकांना मंत्रमुग्ध केले. राजस्थान उर्दु अकादमी चे सचिव मोअज्जम अली यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेखा सादर करून मुशायर्यात आलेल्या जयपूर,आग्रा,दिल्ली,लखनऊ अहमदनगर,उज्जैन, गोवा, गोलियर, बांसवाडा व इतर ठिकाणच्या सर्व कवयित्रींचे आभार व्यक्त केले.
मुशायराच्या अध्यक्षस्थान राजस्थान मानवी हक्क कमिशन चे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांनी भूषविले. उद्घाटन डिविजनल कमिशनर व एडमिनिस्ट्रेटिव राजस्थान उर्दू अकॅडमी चे डॉ. सुमित शर्मा यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थान वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष मोहम्मद युसुफ,आमदार जिविकार रफिक खान आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment