अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स इन सोशल इम्पॅक्ट पुरस्कारासाठी सतीश भालेकर यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स इन सोशल इम्पॅक्ट पुरस्कारासाठी सतीश भालेकर यांची निवड

 अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स इन सोशल इम्पॅक्ट पुरस्कारासाठी सतीश भालेकर यांची निवड

अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स हा सन्मान म्हणजे इन्फोसिसचा ऑस्कर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः इन्फोसिसचा ही सॉफ्टवेअर मधील जगप्रसिद्ध कंपनी व त्यात कार्यरत असणारे पारनेर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर सतीश भालेकर यांनी आपल्या व्यवसायात सर्वोत्कृष्ठ योगदान देत , समाजामध्ये समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने पेटून उठलेला ध्येयवेडा तरुणाने वडनेर हवेली येथे पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून गावात जलाशयांचे काम केले व गावाला पाणीदार होण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या सामजिक कामामुळे त्यांचा अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स इन सोशल इम्पॅक्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.इन्फोसिसच्या जगभरातील 2 लाख ऍम्प्लॉइजमधून सोशल इम्पॅक्ट या कामासाठी त्यांची निवड करण्यात आली.
   सतीश भालेकर हे पुणे आयटी कंपनीत कार्यरत आहेत तेथील ऑफिसचे काम व गावाकडील सामजिक काम यामध्ये  योग्य समतोल राखत आज पर्यंतच्या केलेल्या कामानिमित्ताने सतीश भालेकर यांना ढहश -ुरीव षेी एुलशश्रश्रशपलश 2020-21  हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे.
यावेळी सतीश भालेकर यांचे वडनेर हवेली व पंचकोशीतील ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.
 या पुरस्कारा बद्दल आ. निलेश लंके यांनी त्यांचे अभिनंदन केले व सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही त्याला असणारे ग्रामीण भागातील प्रश्न व त्याच्यावर अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे वेळोवेळी त्यांनी आपल्या गुणवत्तेचा सामाजिक कामांमध्ये उपयोग केला आहे त्याचा एक चांगल्या कामाबद्दल हा पुरस्कार मिळाला असून यापुढेही त्याच्याकडून असेच काम होत राहो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here