कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या सौ मनीषा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या सौ मनीषा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड

 कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या सौ मनीषा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड



नगरी दवंडी


कर्जत -कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या सौ मनीषा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली. आज सभापती निवडीच्या पीठासीन अधिकारी व प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी त्याची निवड झाली केली. सभापती पदासाठी त्याचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. 

              कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ अश्विनी शामराव कानगुडे यांनी ठरल्याप्रमाणे आपला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर कोरेगाव पंचायत समितीतून निवडून आलेल्या सौ मनीषा दिलीप जाधव यांची वर्णी लागेल अशी अटकळ बांधली जात होती. ठरल्याप्रमाणे आमदार रोहित पवार यांनी कोरेगाव पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ मनीषा दिलीप जाधव यांना संधी दिली. आज सभापती पदासाठी जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने दुपारी प्रांतअधिकारी नष्टे यांनी त्यांची निवड जाहीर केली यावेळी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत पंचायत समितीचे उपसभापती हेमंत मोरे, माजी सभापती अश्विनी कानगुडे, माजी उपसभापती शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत, यांच्यासह राष्ट्रवादीचे राजेंद्र गुंड, माजी सभापती साधना कदम हे उपस्थित होते तर भाजपाचे बाबासाहेब गांगर्डे व ज्योति प्रकाश शिंदे हे मात्र अनुपस्थित राहिले. निवडीनंतर नष्टे यांनी नूतन सभापती जाधव यांचा सत्कार केला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी कर्जत जामखेडचे आ रोहित पवार यांनी आपल्याला दिलेल्या संधीचे सभापती काळात सोने करू व सर्वसामन्याच्या हितासाठी पूर्णवेळ काम करू असा विश्वास व्यक्त केला. 

                या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शाम कानगुडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, नानासाहेब निकत, अशोकराव जायभाय, शिवसेनेचे शहर प्रमुख अशोक डोंगरे, दिलीप जाधव, कोरेगावचे सरपंच काकासाहेब शेळके आदीसह अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment