नगरमधील या बँकेला लावला पाच कोटीचा चुना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

नगरमधील या बँकेला लावला पाच कोटीचा चुना

 नगरमधील या बँकेला लावला पाच कोटीचा चुना.नगरी दवंडी

अहमदनगर - आतापर्यंत आपण मोठमोठ्या शहरात बँकेची फसवणूक केल्याच्या घटना ऐकल्या होत्या मात्र आता हे प्रकार नगरमध्ये देखील होत असल्याचे समोर आले आहे. नगरमधील महाराष्ट्र बँकेला चक्क ५ कोटींचा चुना लावल्याचा धक्कदायक प्रकार उघड झाला आहे.

याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे यांनी दि.२५ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ,

मृदूल अशोक मवाळ (सर्व रा. भिस्तबाग, अहमदनगर) यांच्यासह सावेडी येथील तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे, नागापूर येथील तलाठी संदीप किसन तरटे व मंडळाधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ धसाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ ऑगस्ट २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला. इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रो आर. ॲण्ड डी सेंटर ॲण्ड सोलुशन या कंपनीचे अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ, मृदूल अशोक मवाळ हे भागीदार आहेत.

त्यांच्या मालमत्तेवर कर्जाचा बोजा असतानाही त्यांनी बोजा कमी करण्यासाठी बनावट लेटरहेड व त्यावर बनावट सही शिक्का मारून सावेडी व नागापूर तलाठी कार्यालयात कागदपत्र सादर केले.

तलाठी देशपांडे व तलाठी तरटे यांना हाताशी धरून मालमत्तेसंर्दभातील फेरफार बेकायदेशीरपणे मंजूर करून घेत बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक दिनकर मुंढे हे पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here