जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्याची आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्याची आत्महत्या.

 जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्याची आत्महत्या.
नगरी दवंडी

अहमदनगर - राहाता तालुक्यातील वाकडी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर मनोहर गायकवाड यांनी राहाता- चितळी रस्त्यालगत वाकडी शिवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की वाकडी येथील जिल्हा बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांचा बुधवार दि.२४ मार्च रोजी दुपारपासून फोन बंद येत असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा वाकडी परिसरात शोध सुरू केला.

या दरम्यान राहता ते चितळी रस्त्यावरून नातेवाईक जात असताना सायंकाळी उशिरा वाकडी शिवारातील कानिफनाथ फाट्यालगत रस्त्याच्या कडेला जमाव दिसला, म्हणून पाहणी केली असता, त्या ठिकाणी गायकवाड यांची दुचाकी दिसली.तात्काळ नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता ज्ञानेश्वर गायकवाड बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अशा वेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ शिर्डी येथील साई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पुढील उपचारसाठी नेले; मात्र उपचाराअगोदर त्यांची प्राणज्योत मावलली होती.

घटनेअगोदर गायकवाड सकाळपासून मार्च महिनाअखेरचे काम सुरू असल्याने बँकेच्या कामकाजात होते. दुपारी १ वाजता त्यांच्या सोबत असलेल्या एका सोसायटीच्या सचिवाने त्यांना घरी सोडले.जेवणाचा डबा घेऊन वाकडी शाखेत येतो, असे सांगत गायकवाड यांनी त्या सचिवाला जाण्यास सांगितले; मात्र नंतर ते वाकडी शाखेत गेलेच नाही. त्यानंतर त्यांचा फोन बंद आला.


गायकवाड यांची १९९१ साली वाकडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. मध्यंतरी तीन वर्षे राहाता परिसरात बदली झाल्यावर पुन्हा त्यांची वाकडी शाखेत बदली झाली. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली होती.ज्या ठिकाणी गायकवाड बेशुद्ध अवस्थेत सापडले, त्याठिकाणी रासायनिक औषध व एक शितपेयाची बाटली आढळून आली. त्या ठिकाणी एक चिठ्ठीदेखील आढळून आली असल्याची परिसरात चर्चा आहे, मात्र ती चिठ्ठी नातेवाईकांना मिळालेली नाही.


याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना घडली ती राहता पोलीस स्टेशन हद्द असल्यामुळे हा तपास राहाता पोलिसांकडे वर्ग झाल्यावर, शवविच्छेदन अहवाल आल्यावर काही गोष्टी समोर येतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here