आम्ही विकासाला महत्त्व देतो आम्हाला औटींची शिकवण : शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

आम्ही विकासाला महत्त्व देतो आम्हाला औटींची शिकवण : शेळके

 आम्ही विकासाला महत्त्व देतो आम्हाला औटींची शिकवण :  शेळके

वाडेगव्हाणमध्ये 1 कोटी रुपयांची कामे मंजूर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यामध्ये तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासाची कामे जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या माध्यमांमधून अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती दाते सर व सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून चालू आहेत.
विकासासाठी शिवसैनिकाना कधीही दुसर्‍याच्या दारात जाऊ देणार नाही असे प्रतिपादन सभापती गणेश शेळके यांनी केले माझ्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा मी माझ्या मतदार संघामध्ये 157 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली होती आम्ही विकासाला महत्त्व देतो आमचे नेते विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजयराव औटी साहेबानी आम्हाला शिकवण दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली दाते सर व मी कामे करत आहोत दाते सरांच्या प्रयनातून व माझ्या पाठपुराव्यातून वाडेगव्हाण गावात 1 कोटी रुपये मंजूर केली आहेत काही कामांचे भूमिपूजन आज केले आहे. तरवडी मळा बंधारा -15 लाख, तार्‍हे मळा बंधारा -15 लाख, रासकर मळा बंधारा-15 लाख, वाडेगव्हान-राळेगणसिद्धी शिवरस्ता दुरुस्ती-3 लाख, वाडेगव्हान-नारायनगव्हान शिवरस्ता दुरुस्ती-3 लाख, तुकाई मंदिर भक्त निवास-15 लाख,तुकाई मंदिर परिसर गार्डन-15 लाख, तुकाई मंदिर परिसर सुशोभीकरण-3 लाख, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे-40 हजार असे एकूण जवळपास 1 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत.
हे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर व पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी रामदास भोसले, विकास रोहोकले,शंकर नगरे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे सर, उपसरपंच रवींद्र शेळके, मा. सरपंच संतोष शेळके, मा सरपंच जयसिंग धोत्रे, शिवसेना ता. युवा सेना प्रमुख नितीन शेळके, डॉक्टर उध्दव शेळके, रामचंद्र शेळके, नवनाथ शेळके, चेअरमन प्रमोद घनवट ,संपत शेळके,दिनेश झांबरे, अतुल शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment