वीज प्रश्नी शेतकर्‍यांचा 20 मार्च रोजी पांढरीपुलावर रास्ता रोकोचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

वीज प्रश्नी शेतकर्‍यांचा 20 मार्च रोजी पांढरीपुलावर रास्ता रोकोचा इशारा

 वीज प्रश्नी शेतकर्‍यांचा 20 मार्च रोजी पांढरीपुलावर रास्ता रोकोचा इशारा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विद्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्‍यांची सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्‍यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिली. वीज अभावी शेतकर्यांची होणारी पिळवणुक न थांबल्यास नगर- औरंगाबाद महामार्गावरील पांढारीपुल येथे शेतकर्‍यांच्या उपस्थितीत शनिवार दि.20 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना तसेच इतर मित्र पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत शेती पंपाचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर राज्य कर्त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे. आज शेतकरी उपाशी असून, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके देखील चांगल्या प्रमाणात येत आहे. मात्र विद्युत महावितरणने बिल न भरल्याचे कारण पुढे करुन जिल्ह्यातील नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी जिल्ह्यातील तालुक्यामध्ये महावितरण कंपनीने शेतीपंपाची वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. या प्रकरणावरुन सरकारची बेबंद मोघलशाही माजली असल्याचे चित्र आहे. राज्यातील ठराविक शेतकरी समृद्ध आहेत. त्यांचे निकष सर्वांसाठी लावता येणार नाही. अल्पभूधारक शेतकर्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने एक आठवडा दिवस आणि एक आठवडा रात्रीची वीज देण्याचे नावापुरते जाहीर केले आहे. ही घोषणा शेतकर्‍यांची थट्टा करणारी आहे. दिवसाची विज नावापुरती असून, ती किमान चार तास सुद्धा मिळत नाही. खरीप रब्बी आणि चारा पिकांना रात्रीचे पाणी देता येते का? हा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शेतकर्‍यांची वीज पंप बंद असताना देखील त्यांची बिले आकारण्यात येतात. काही शेतकर्यांना महावितरणने अनेक वर्षापासून बिले देखील दिलेली नाहीत. एकदम बिल पाठवून त्यांच्याकडून वसुलीचा आग्रह धरला जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व घरी असताना शेतात शेतकरीने राबून सर्वांचे पोट भरले आहे. याचा विचार करण्याची देखील गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here