नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या पुढाकाराने नालेगाव अमरधामसाठी अस्थी रक्षेचे गंगा-गोदावरीत विसर्जन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या पुढाकाराने नालेगाव अमरधामसाठी अस्थी रक्षेचे गंगा-गोदावरीत विसर्जन

 नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या पुढाकाराने नालेगाव अमरधामसाठी अस्थी रक्षेचे गंगा-गोदावरीत विसर्जन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील नालेगाव येथील अमरधामसाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने दोन रक्षा अस्थी कलश कुंड भेट देऊन, कुंडात जमलेल्या अस्थी रक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व सभासदांनी पैठण येथील गंगा-गोदावरी येथे विसर्जित केल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड, अशोक भाकरे, घनश्याम कातोरे, बाळू गायकवाड, गणेश भोसले, आजीनाथ सकट आदी उपस्थित होते.  
शहरातील अमरधाममध्ये बेवारस, गोर-गरीब व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या रक्षा अमरधाम येथील कचर्याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन विटंबना होत होती. या अस्थी रक्षा अमरधाममध्ये लावण्यात आलेल्या अस्थी कलश कुंडात संकलीत करण्याचे काम नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. तर जमा झालेल्या अस्थी रक्षा गंगा-गोदावरी येथे विसर्जित करण्याची निशुल्क सेवा देण्याची जबाबदारी देखील संस्थेने घेतली होती. या पार्श्वभूमीवर जमा झालेल्या अस्थी रक्षेचे विसर्जन करण्यात आले आहे. अंतोन गायकवाड म्हणाले की, माणुसकीच्या भावनेने निस्वार्थपणे नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने या उपक्रमास पुढाकार घेतला आहे. नालेगाव येथील अमरधाममध्ये अंत्यविधी पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात अस्थी रक्षा कचरा व गटारीच्या ठिकाणी पडून विटंबना होत होती. यासाठी अमरधाममध्ये अस्थी रक्षा कळस बसवून, ही विटंबना थांबावी या हेतूने हे उपक्रम सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमास नगरसेवक सुभाष लोंढे, उमेश (गणेश) कवडे, सोनाली चितळे, सुवर्णा गेनाप्पा यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment